ऑक्टोबर २०२६ हा सण आणि सुट्ट्यांनी भरलेला महिना आहे. त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम असल्यास ग्राहकांनी सुट्ट्यांची तारीख आधी तपासणं गरजेचं आहे. RBI च्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, ऑक्टोबरमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये सण, स्थानिक उत्सव आणि नियमित सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार आहेत.
२ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँका बंद राहतील. त्यानंतर 10 ऑक्टोबरला दुसरा शनिवार आणि 24 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. ५, ११, १८ आणि २५ ऑक्टोबर हे रविवार असल्याने या दिवशीही बँकांच्या शाखा बंद राहतील. याशिवाय दुर्गापूजा, दसरा, विजयादशमी, लक्ष्मीपूजा आणि इतर स्थानिक सणांनुसार विविध राज्यांमध्ये अतिरिक्त सुट्ट्या असतील.
ऑक्टोबरमध्ये त्रिपुरा राज्यात सर्वाधिक १२ दिवस बँक शाखांमध्ये कामकाज होणार नाही, अशी दिलेल्या RBI यादीतील माहितीनुसार नोंद आहे. येथे २, १७, १९, २०,२१ आणि २६ ऑक्टोबरला सणांच्या सुट्ट्या आहेत. त्यासोबत चार रविवार आणि दोन शनिवार मिळून एकूण १२ दिवस सुट्टी होते. पश्चिम बंगालमध्ये सुमारे ११ दिवस, तर गंगटोकमध्ये १० दिवस बँक सुट्ट्या असल्याचे या यादीत नमूद आहे.
बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना डिजिटल व्यवहारांसाठी अडचण येणार नाही. UPI, ATM, मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवा सामान्यतः 24 तास उपलब्ध राहतील. मात्र चेक क्लिअरिंग किंवा शाखेत प्रत्यक्ष जाऊन करायचे काम असल्यास सुट्ट्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन आधीच नियोजन करणे योग्य ठरेल.
टीप: बँक सुट्ट्या राज्यानुसार आणि स्थानिक नियमांनुसार वेगळ्या असू शकतात. त्यामुळे शाखेला भेट देण्यापूर्वी संबंधित बँकेचे स्थानिक हॉलिडे कॅलेंडर तपासणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.