Bank Holidays November 2026 saam tv
बिझनेस

Bank Holidays November : १० आणि ११ नोव्हेंबरला बँका बंद! तुमच्या शहराचं नाव यादीत आहे का?

RBI Holiday List : नोव्हेंबरमध्ये १० आणि ११ तारखेला देशातल्या काही शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav

बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नोव्हेंबर महिन्यात सण आणि स्थानिक सुट्ट्यांमुळे काही शहरांमध्ये बँकांचे कामकाज बंद राहील. विशेष म्हणजे, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी देशातल्या काही निवडक शहरांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुमच्या शहरातल्या सुट्ट्यांची माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

१० नोव्हेंबरला कुठे बँका बंद राहणार?

मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी मुंंबई, अहमदाबाद, नागपूर, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून आणि गंगटोक या ठिकाणी RBI केंद्रांशी संबंधित बँकांना सुट्टी असेल. या दिवशी संबंधित शहरांमधल्या बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांना नियमित काउंटर सेवा वापरता येईल. चेक क्लिअरन्ससारख्या कामांना पुढच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत वाट पाहायला लागू शकते.

११ नोव्हेंबरला या शहरांमध्ये बँका बंद

बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी कोलकाता, लखनऊ, कानपूर, शिमला, इंफाळ आणि गंगटोक या शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे या शहरांमध्ये बँकेत जाऊन पैसे जमा करणे, चेक जमा करणे, डिमांड ड्राफ्ट बनवणे किंवा लॉकरचा वापर करणे यांसारखी कामे करता येणार नाहीत.

डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहणार

बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना डिजिटल व्यवहार करता येतील. UPI आणि IMPS सेवा नेहमीसारख्याच सुरू राहतील. तसेच नेट बँकिंगच्या माध्यमातून NEFT आणि RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर करता येतील. ATM मधून पैसे काढण्याची सुविधाही सुरू राहणार आहे. मात्र, सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी ATM मध्ये पैसे भरायला उशीर होऊ शकतो.

शेअर बाजाराचे कामकाजही राहणार बंद

१० नोव्हेंबर रोजी NSE आणि BSE या दोन्ही शेअर बाजारांमध्ये पूर्ण दिवसाची सुट्टी असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले व्यवहार आणि आर्थिक नियोजन त्यानुसार करणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात मोठी खळबळ! अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात आहे का? सत्ताधारी नेत्यानं केली चौकशीची मागणी

Maharashtra News Live Update: गोकुळच्या शासन नियुक्त संचालकांच्या मतदान अधिकाराला आव्हान! याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू

Diwali Firecrackers : दिवाळीचे फटाके ठरले जीवघेणे! 6 जणांच्या डोळ्यांतून रक्तस्राव, 2 जण गंभीर

पाकिस्तानात लोकप्रिय न्यूज अँकरचा संशयास्पद मृत्यू; पती पोलिसांच्या ताब्यात, पत्रकार जगतात शोककळा

पैशांना आकर्षित करणारे स्वयंपाकघरातील 5 मसाले, आजच घरी आणा

SCROLL FOR NEXT