bank holiday  Saam Tv
बिझनेस

Bank Holiday: मार्चमध्ये बँकांना १४ दिवस सुट्टी, एका क्लिकवर वाचा यादी

Bank Holidays In March 2024: बँकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मार्च महिन्यात अनेक सण आहेत. यामुळं बॅंका १४ दिवस बंद राहणार आहेत.

Rohini Gudaghe

Bank Holiday March 2024 List

बँकेचे (Bank) व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मार्च महिन्यातील अनेक सणांमुळे देशभरातील बँका १४ दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये पाच रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार या सुट्ट्यांचाही समावेश (Bank Holiday) आहे. त्यामुळे आपल्या बॅंकेतील व्यवहारांचं योग्य नियोजन करा, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. (Latest News)

शिवरात्री, होळीचा आणि गुड फ्रायडे या सणांमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत. मार्च महिन्यात अनेक सण आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात देशभरातील बँकांना १४ दिवस सुट्या असणार (Bank Holiday March 2024 List) आहेत. देशात कोणत्या दिवशी आणि कोणत्या कारणास्तव बँकांना सुट्ट्या असतील हे आपण जाणून घेऊ या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मार्च महिन्यात बँका १४ दिवस बंद

  • 1 मार्च रोजी चापचर कुटमुळे मिझोराममधील आयझॉल शहरातील बँकांना सुट्टी

  • 3 मार्च रविवार असल्यानं देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी (Bank Holidays In March 2024)

  • 8 मार्च रोजी महाशिवरात्री असल्यानं देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

  • 9 मार्च हा दुसरा शनिवार असल्यानं देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी

  • 10 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

  • 17 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

  • 22 मार्च रोजी बिहार दिनानिमित्त बिहारमधील बँकांना सुट्टी

  • 23 मार्चला चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी

  • 24 मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी (Bank Holiday March List)

  • 25 मार्चला होळीनिमित्त देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्टी

  • 26 मार्चला भुवनेश्वर, इम्फाळ आणि पाटणा येथील बँकांना सुट्टी

  • 27 मार्चला होळीनिमित्त बिहारमधील सर्व शहरांतील बँकांना सुट्टी

  • 29 मार्च रोजी गुड फ्रायडेनिमित्त देशभरात बँकांना सुट्टी

  • 31 मार्च रोजी रविवार असल्याने देशातील सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT