Fixed Deposit meta ai
बिझनेस

Bank FD : बँकेत 10 लाखांची FD आहे? बँक बुडाली तर हातात किती पैसे येणार? जाणून घ्या नियम

Fixed Deposit : बँकेत १० लाखांची FD असेल आणि बँक बुडाली तर संपूर्ण रक्कम सुरक्षित राहतं का? DICGC च्या ५ लाखांच्या विमा मर्यादेते नियम आणि FD सुरक्षित ठेवण्याचे पर्याय जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येकालाच त्याच्या कमाईतले पैसे जमा करून भविष्यात मोठा लाभ मिळवायचा असतो. यासाठी FD हा ऑप्शन बरेच लोक निवडतात. पण ज्या बँकेत पैसे ठेवलेले आहेत ती बँक आर्थिक अडचणीत आली किंवा बँक बंद पडली तर आपल्या ठेवींचं काय होतं, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशा परिस्थितीमध्ये DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) च्या नियमांची माहिती असणं महत्त्वाचं आहे.

DICGCच्या नियमांनुसार, एका बँकेत एका जमाकर्त्याला कमाल ५ लाख रुपयांपर्यंतचा डिपॉझिट इन्शुरन्स कवर मिळतो. या मर्यादेत मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारं व्याज, दोन्हींचा समावेश होतो.

१० लाखांची FD असेल तर काय होईल?

समजा, तुमची एखाद्या बँकेत १० लाख रुपयांची FD आहे आणि संबंधित बँक अपयशी ठरली. अशावेळी संपूर्ण १० लाख रुपयांवर DICGCचे ५ लाख रुपयांचं विमा संरक्षण लागू होत नाही. मूळ रक्कम आणि व्याज मिळून जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंतच विमा संरक्षण लागू होतं. उर्वरित रकमेवर ही विमा सुरक्षा लागू होत नाही.

एकाच बँकेत अनेक FD केल्याने कवर वाढत नाही

एकाच बँकेत २ ते ३ वेगवेगळ्या FD केल्याने स्वतंत्र ५ लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळत नाही. उदाहरणार्थ एका बँकेत बचत खात्यात ४ लाख, एका FDमध्ये ५ लाख आणि दुसऱ्या FDमध्ये ३ लाख रुपये असतील, तर विमा कवर ठरवताना या ठेवी सामान्यत: एकत्रित विचारात घेतल्या जातात. तसेच एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये पैसे ठेवल्यानेही स्वतंत्र कवर मिळत नाही.

त्यामुळे FD करताना फक्त व्याज पाहू नका. संबंधित बँर DICGCच्या विमा योजनेअंतर्गत आहे का, तसेच ५ लाखांची मर्यादा मूळ रक्कम आणि व्याजासह लागू होते, हे तपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : शरद पवार यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस

Morning Walk Benefits: मॉर्निंग वॉक न चुकता करताय? हे 6 सॉलिड फायदे माहिती असायलाच हवेत

Ambulence App : महाराष्ट्रात आता कॅबसारखी बुक करता येणार रुग्णवाहिका, सरकार लवकरच लाँच करणार अॅप

CJP protest: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJP आक्रमक; राजीनामा न दिल्यास 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर धडकणार

Heatwave Alert : राज्यातून पाऊस गायब, मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT