SBI BANK ALERT: BRANCHES MAY REMAIN CLOSED FOR 6 DAYS FROM MAY 23 Saam Tv
बिझनेस

Bank Closed : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, शनिवारपासून ६ दिवस बँका बंद, कारण काय?

SBI Bank Strike News : एसबीआय ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २३ मे २०२६ पासून सलग ६ दिवस बँक शाखा बंद राहणार आहे. संप, विकेंड सुट्ट्या आणि बकरी ईदमुळे या सुट्ट्या आहेत. ऑनलाइन सेवा मात्र सुरू राहणार.

Alisha Khedekar

  • २३ मेपासून सलग ६ दिवस SBI शाखा बंद राहण्याची शक्यता

  • संप, विकेंड सुट्ट्या आणि बकरी ईद लागोपाठ सुट्ट्या

  • ऑनलाइन आणि ATM सेवा सुरळीत सुरू राहणार

  • ग्राहकांनी महत्त्वाची कामे आधीच पूर्ण करण्याचा सल्ला

जर तुमचे SBI (State Bank of India) मध्ये खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या शाखा २३ मे २०२६ पासून सलग सहा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर बँकेचे कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार असल्याने बँक बंद राहणार असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या काळात ऑनलाईन सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहतील, त्यानंतर २४ मे रोजी रविवारी नियमित सुट्टी असेल. यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर २५ आणि २६ मे रोजी एसबीआय कर्मचारी संघटनांकडून प्रस्तावित संपाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन दिवसांतही शाखांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. याशिवाय, RBI ने बकरी ईद निमित्त २७ आणि २८ मे रोजी बँकांना सुट्टी जाहीर केली आहे. विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन्ही दिवशी सुट्टी असल्याने सलग सहा दिवस बँका बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एसबीआय स्टाफ फेडरेशनने या संपामागील कारणांमध्ये नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग, करिअर प्रोग्रेशन स्कीम, एचआरएमएस संबंधित समस्या तसेच NPS फंड व्यवस्थापकांच्या भरती प्रक्रियेतील मुद्दे अधोरेखित केले आहेत. ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ या संघटनेने या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, ग्राहकांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे या काळात ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहेत. इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय व्यवहार आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. त्यामुळे रोख रक्कम काढणे किंवा डिजिटल व्यवहार करण्यात अडचण येणार नाही. मात्र, चेक क्लिअरन्स, डीडी, खाते उघडणे किंवा इतर शाखा-आधारित कामांसाठी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी २३ मेपूर्वीच आपली सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Yoga Poses: वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग, जिमला न जाता घरीच करा हे 5 योगा

म्हाडाचा मोठा निर्णय; मुंबईमध्ये घरांची लॉटरी! पत्राचाळ प्रकल्पात आणखी १४१८ घरांची भर

CBI च्या चौकशीत NEET पेपरफुटीचा मोठा खुलासा, पेपर खरेदी करणाऱ्या पालकांवर कारवाई, यादी तयार

Maharashtra News Live Update: पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका - देवेंद्र फ़डणवीस

Jio Recharge: 198 रुपयांमध्ये दिवसाला 2 GB डेटा अन् मिळणार या विशेष सुविधा

SCROLL FOR NEXT