ऑगस्ट महिना संपायला काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. महिनाअखेरीस काही महत्त्वाच्या आर्थिक कामांच्या मुदती जवळ आल्या आहेत. ही कामे वेळेत पूर्ण न केल्याने जास्त शुल्क, दंड किंवा इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ऑगस्ट संपण्याआधी पुढील चार महत्त्वाची कामं एकदा नक्की तपासा.
व्यवसाय, फ्रीलान्सिंग, युट्यूब, इन्स्टाग्राम किंवा इतर माध्यमांतून उत्पन्न मिळवत असाल, तर आयटीआर भरण्याची अंतिम तारीख तपासा. तुमच्या खात्यांचे ऑडिट गरजेचे असल्यास ३१ ऑगस्ट २०२६ ही महत्त्वाची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उत्पन्नाचा तपशील आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून वेळेवर रिटर्न भरला पाहिजे.
रिटर्न भरताना फक्त तुमचं उत्पन्न लक्षात घेऊ नका. बँकेच्या खात्यातले व्याज, शेअर्स किंवा इतर गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न, घरभाडे, फ्रीलान्सिंग तसेच सोशल मीडिया कमाई या सर्वाचाही हिशोब तपासा. कोणतंही उत्पन्न दाखवायचं राहून गेलं नाही ना, याची खात्री करून घ्या.
क्रेडिट कार्ड वापरत अ तुमच्या बँकेने किंवा कार्ड कंपनीने ऑगस्टमध्ये नवीन नियम किंवा शुल्क लागू केले आहेत का, हे तपासा. भाडे, विमा, शिक्षण आणि सरकारी पेमेंटसारख्या व्यवहारांवरील शुल्क किंवा रिवॉर्ड पॉइंट्सचे नियम बदलले असू शकतात.
बँक खात्याशी जोडलेला मोबाइल नंबर, ई-मेल आणि इतर माहिती अपडेट आहे का, हे तपासा. बँकेने KYC किंवा कोणतेही कागदपत्र अपडेट करायला सांगितले असेल तर ते वेळेत पूर्ण करा. तसेच खात्यातले व्यवहार रोजच्या रोज तपासत राहा. अनोळखी किंवा संशयास्पद व्यवहार दिसत असतील तर तातडीने बँकेशी संपर्क साधा. ऑगस्ट संपण्याआधी या चारही बाबींची तपासणी केल्याने भविष्यातले अनावश्यक त्रास आणि आर्थिक नुकसान टाळायला मदत करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.