Ather Rizta Electric Scooter Saam Tv
बिझनेस

Electric Scooter: सीएसटी-पनवेल-सीएसटी; जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत

Ather Rizta Electric Scooter: भारतात दुचाकी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केलेल्या Ather ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 'Rizta' भारतात लॉन्च केली आहे.

Satish Kengar

Ather Rizta Electric Scooter:

भारतात दुचाकी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केलेल्या Ather ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 'Rizta' भारतात लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत 1.10 लाख रुपये आहे. या स्कूटरच्या टॉप मॉडेलची किंमत 1.45 लाख रुपये आहे. कुटुंबाला लक्षात ठेवून ही स्कूटर डिझाइन करण्यात आली आहे.

कंपनीने यात मोठी स्पेस दिली आहे. याची सीटही मोठी आहे. यात अनेक कनेक्टेड फीचर्सही देण्यात आले आहेत. याची डिलिव्हरी जुलैमध्ये सुरू होईल. ही स्कूटर नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ही स्कूटर दोन बॅटरी पॅकसह लॉन्च करण्यात अली आहे. तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये नवीन स्कूटर बुक करू शकता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किती देते रेंज?

नवीन Ather Rizta दोन बॅटरी पॅकसह लॉन्च करण्यात आली आहे. यात 2.9 kWh बॅटरी पॅक एका चार्जमध्ये 123 किमीची रेंज देतो आणि इतर 3.7 kWh बॅटरी पॅक 125 किमीची रेंज देतो, असा दावा कंपनीने केला आहे. ही स्कूटर 3.7 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग प्राप्त करू शकते. याचा टॉप स्पीड 80 किमी/तास आहे. (Latest Marathi News)

या स्कूटरमध्ये सेगमेंटमधील सर्वात मोठी सीट आणि 56 लीटर स्टोरेज ग्राहकांना मिळतं. याशिवाय या स्कूटरमध्ये 7.0 इंचाचा नॉन-टच डिजिटल डिस्प्ले आहे. यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचर्स ग्राहकांना मिळणार.

नवीन Rizta दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात Rizta S आणि Rizta Z यांचा समावेश आहे. याच्या Rizta S प्रकारात 2.9kWh बॅटरी पॅक आहे. जी एका चार्जमध्ये 123 किलोमीटरची रेंज ऑफर करते, तर Rizta Z प्रकारात 3.7 kWh बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जमध्ये 160 किलोमीटर अंतर कापू शकतो. तर त्याचा टॉप स्पीड 80 किमी/तास आहे. ही स्कूटर IP67 रेटिंगसह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

बहीण भावाच्या नात्याला काळिमा! वारंवार अत्याचार केल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

SCROLL FOR NEXT