Government Scheme
Government Scheme Saam TV
बिझनेस

Government Scheme: दर महिन्याला २१० रुपये भरा अन् वर्षाला ६० हजारांची पेन्शन मिळवा; कशी आहे सरकारची अटल पेन्शन योजना?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकालाच आपल्या भविष्याची काळजी असते. त्यामुळे अनेकजण भविष्याच्या दृष्टीने आर्थिक गुंतवणूक करतात. अडचणीच्या काळात हेच पैसे उपयोगी पडतात.त्यामुळेच सरकारच्या अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करु शकतात. सरकारच्या योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. अशीच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. ही योजना सरकारद्वारे राबवली जाते. यात सरकार कर्मचारी आणि कामगारांना सेवानिवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळवून देते. यासाठी तुम्हाला दरमहिन्याला फक्त २१० रुपयांची गुंतवणूक करायची असते. यात तुम्हाला वार्षित ६० हजार रुपये पेन्शन मिळते. जाणून घेऊया या योजनेबद्दल.

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला दर महिन्याला २१० रुपये जमा करायचे असतात. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये म्हणजे वर्षाला ६०,००० रुपये मिळतील. या योजनेत तुम्ही दर तीन महिन्यांनीदेखील पैसे भरु शकतात. परंतु दर तीन महिन्यांनी तुम्हाला ६२६ रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही सहा महिन्यांनी पैसे भरले तर तुम्हाला १२३९ रुपये भरावे लागतील. जर तुम्ही वयाच्या १८व्या वर्षापासून दर महिना ४२ रुपये भरल्यास तुम्हाला दरमहिना १,००० रुपये मिळतील.

अटल पेन्शन योजनेचे फायदे

सेवानिवृत्तीनंतर लोकांना दर महिना ठरावीक रक्कम मिळावी हा या योजनाचा उद्देष आहे.या योजनेत लोकांना दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळते. त्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न सुरु राहते. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणद्वारे चालवली जाते.

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला दर महिन्याला १,००० ते ५००० रुपये मिळतात. या योजनेत सरकार पेन्शनची हमी देते. तुम्ही जी रक्कम गुंतवणूक करतात त्यावर तुम्हाला भविष्यात किती रुपये पेन्शन मिळणार हे आवश्यक असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung ते Oppo, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भारतात लॉन्च होणार हे जबरदस्त स्मार्टफोन

Budh Gochar: एक जुलैपासून बुध करणार पुष्य नक्षत्रात प्रवेश; ५ राशींचं चमकणार नशीब

12GB RAM आणि 512GB स्टोरेज, Honor 200 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च

England Team: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

Weekly Horoscope: आजपासून बदलणार या 5 राशींचे भाग्य, 7 दिवस सूर्यासारखे चमकेल नशीब

SCROLL FOR NEXT