iPad Pro Saam Tv
बिझनेस

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Apple Let Loose Event: Apple ने आपले चार नवीन iPads मंगळवारी लॉन्च केले आहेत. कंपनीने 11-इंच आणि 13-इंच प्रकारांमध्ये iPad Air सादर केला आहे. जो फास्ट चिपसेटसह येतो.

साम टिव्ही ब्युरो

Apple IPad Air and IPad Pro launch:

Apple ने आपले चार नवीन iPads मंगळवारी लॉन्च केले आहेत. कंपनीने 11-इंच आणि 13-इंच प्रकारांमध्ये iPad Air सादर केला आहे. जो फास्ट चिपसेटसह येतो. तर iPad Pro मध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. यावेळी कंपनीने नवीन M4 चिपसेटसह 11 आणि 13 इंच स्क्रीन साईझमध्ये iPad Pro सादर केला आहे.

नवीन iPad Pro मध्ये सर्वात पॉवरफुल M4 चिपसेट ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. Apple चे म्हणणे आहे की, नवीन टॅबलेट त्यांच्यासाठी बेस्ट आहे, जे व्हिडिओ बनवतात आणि मल्टीमीडिया कन्टेन्ट पाहण्याचे शौकीन आहेत. एकूणच नवीन चिपसेट आयपॅड प्रोला सर्वात पॉवरफुल डिव्हाइस बनवते. M4 व्यतिरिक्त कंपनीने iPad Pro मध्ये नवीन OLED डिस्प्ले देखील दिला आहे. कंपनी या नवीन डिस्प्लेला अल्ट्रा XDR डिस्प्ले म्हणते.

याशिवाय कंपनीने डिझाइनमध्येही बदल केले आहेत. iPad Pro 13-इंच फक्त 5.3 मिमी पातळ आहे. तर iPad Pro 11-इंच 5.1 मिमी पातळ आहे. Apple ने असेही म्हटले आहे की, आयपॅड प्रोमध्ये परफॉर्मन्स आणि हीट सिंक सुधारण्यासाठी ग्राफीन लेयर जोडला आहे.

दरम्यान, iPad Air मध्ये M2 चिपसेट देण्यात आला आहे. जो 11-इंच आणि सर्व-नवीन 13-इंचामध्ये सादर केला गेला आहे. जबरदस्त लिक्विड रेटिना डिस्प्लेसह, कंपनीने यातकाही AI कॅपॅबिलिटी आणि नवीन ॲक्सेसरीज सपोर्ट जोडल्या आहेत.

आयपॅड एअर आणि आयपॅड प्रोची किंमत

भारतात नवीन आयपॅड एअर स्टारलाईट, स्पेस ग्रे, ब्लू आणि पर्पल रंगांमध्ये सादर करण्यात आले आहे. 11-इंच आयपॅड एअरची किंमत 59,900 रुपये आहे. तर 13-इंच आयपॅड एअरची किंमत 79,900 रुपये आहे. तसेच iPad Pro च्या 11-इंच प्रकार 99,900 रुपयांपासून सुरू होतो. तर 13-इंच प्रकाराची प्रारंभिक किंमत 1,49,900 रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

SCROLL FOR NEXT