Amazon Republic Day sale 2024 Saam Tv
बिझनेस

Amazon वर उद्यापासून सुरु होणार सिक्रेट सेल, प्रत्येक वस्तू फक्त 1 रुपयात मिळेल; नेमकी काय आहे ऑफर?

Amazon Secret Sale: Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल उद्या प्राइम यूजर्ससाठी दुपारपासून सुरू होणार आहे. ई-कॉमर्स कंपनीने आधीच विशलिस्ट पेज लॉन्च केले आहे आणि गेट सेल रेडी सेक्शन सादर केलं आहे.

Satish Kengar

Amazon Republic Day sale 2024:

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल उद्या 13 जानेवारी रोजी प्राइम यूजर्ससाठी दुपारपासून सुरू होणार आहे. ई-कॉमर्स कंपनीने आधीच विशलिस्ट पेज लॉन्च केले आहे आणि गेट सेल रेडी सेक्शन सादर केलं आहे.

यातच Amazon वरच सिक्रेट सेक्शन तयार करण्यात आलं आहे. जिथून फक्त 1 रुपयात शॉपिंग करता येते? आज आम्ही तुम्हाला Amazon च्या Sample Mania सेक्शनबद्दल सांगणार आहोत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sample Mania ऑफर काय आहे?

Amazon वरील सॅम्पल मॅनिया सेक्शनमध्ये ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी प्रोडक्टचे सॅम्पल वापरून पाहण्यासाठी दिले जातात. सामान्यतः अॅमेझॉन हे सॅम्पल 99 रुपयांना विकतो. मात्र रिपब्लिक डे सेल निमित्ताने खरेदीदारांना हे सॅम्पल फक्त 1 रुपयात मिळू शकतात. सेल दरम्यान, Amazon दररोज दुपारी 3 वाजता नवीन सॅम्पल सादर करेल, जिथे तुम्हाला 1 रुपयात प्रोडक्टचे सॅम्पल खरेदी करण्याची संधी मिळेल. (Latest Marathi News)

Amazon India वेबसाइटवरील सॅम्पल मॅनिया सेक्शनमध्ये कॉस्मेटिक आणि हेल्थशी संबंधित प्रोडक्टचे सॅम्पल ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत.

13 जानेवारी रोजी ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू झाल्यावर, सेलिंग पेजवर सॅम्पल मॅनिया सेगमेंटला भेट द्या. तुम्हाला हवे आहेत, ते प्रोडक्ट तुम्ही येथे शोधू शकता आणि तुमच्या कार्टमध्ये अॅड करू शकता. कार्ट पेजवर, "Collect one sample" पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाठवलं जाईल. असं असलं तरी अद्यापही ऑर्डर अॅक्टिव्ह झालेली नाही. ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु झाल्यावर ग्राहकांना ही ऑफर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT