Offer on Dell and Lenovo Laptops Saam TV
बिझनेस

16GB आणि 512GB SSD स्टोरेज, Amazon Prime Day सेलमध्ये 30000 च्या आत बेस्ट लॅपटॉप खरेदी करण्याची संधी

साम टिव्ही ब्युरो

Amazon वर या शुक्रवार 20 जुलैपासून प्राइम डे सेल (Amazon Prime Day Sale) सुरू होत आहे. या सेलचा फायदा मोठा फायदा Amazon च्या प्राइम सब्सक्राइबर्सला होणार असून यादरम्यान अनेक उत्पादने मूळ किंमतीपेक्षा खूपच कमी किंमतीत खरेदी करता येतील.

यातच जर नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तरीही ही एक चांगली संधी आहे. विक्रीमध्ये उपलब्ध डील्सबद्दल माहिती समोर आली आहे. आम्ही तुम्हाला अशा लॅपटॉप्सबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यात तुम्हाला 8GB रॅम मिळेल आणि यांची किंमतही 30,000 रुपयांच्या आत आहे.

Lenovo IdeaPad Slim 1

लेनोवोच्या या लाइटवेट लॅपटॉपची किंमत 37,990 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हा लॅपटॉप 35,240 रुपयांच्या किमतीत तुम्हाला खरेदी करता येईल. जर तुम्हाला हा लॅपटॉप 30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्यायचे असेल, तर तुम्ही तुमचा जुना लॅपटॉप बदलून 27,500 रुपयांची कमाल सूटही यावर मिळवू शकता. Windows 11 वर काम करणाऱ्या या लॅपटॉपमध्ये 16GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेजसह AMD Ryzen 5 5500U प्रोसेसर आहे.

Dell 15 Laptop

डेलचा हा लॅपटॉप Amazon वर 34,490 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. मात्र सेलदरम्यान हा ग्राहकांना 28,990 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय जुन्या लॅपटॉपच्याच्या बदल्यात 14,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील यावर दिला जाईल. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 250nits च्या पीक ब्राइटनेससह 15.6-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. Widnows 11 वर काम करणाऱ्या या लॅपटॉपमध्ये 12व्या जनरेशनचा इंटेल कोर i3 प्रोसेसर आहे.

Acer Aspire Lite

Acer चा नवीन लॅपटॉप 29,990 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र सेलमधील ऑफरमुळे ग्राहकांना हा 25,990 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय जुन्या लॅपटॉपवर14,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही ग्राहकांना मिळू शकतो. यात एचडी वेबकॅम आणि 180 डिग्री बिजागर यंत्रणेसह कॉम्पॅक्ट डिझाइन यासारखे फीचर्स आहेत. हा लॅपटॉप 8GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेजसह येतो. यात 12th Gen Intel Core i3 चिप देखील आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आंदोलन

Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, भाजपचा थेट सत्तेचा दावा

Madhya Pradesh Jabalpur Accident : भीषण! भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी कटोरा घेऊन फिरत आहेत; बावनकुळेंची बोचरी टीका

Pune crime : पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल; शिक्षक पतीला राग अनावर, बिहारी मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढला!

SCROLL FOR NEXT