Maharashtra Budget Saam Tv
बिझनेस

Maharashtra Budget: अजित पवारांनंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? या नेत्याकडे धुरा जाण्याची शक्यता

Who will Present Maharashtra Budget After Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर आता राज्याच्या राजकारणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवारांनंतर अर्थ खाते कोणाकडे जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

Siddhi Hande

राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांचे निधन

अजित पवारांनंतर अर्थ खाते कोणाकडे जाणार?

राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. काल सकाळी झालेल्या विमान अपघातात अजित पवारांनी शेवटचा श्वास घेतला. अजित पवारांच्या निधनानंतर आता पुढे काय असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. अजित पवारांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याकडचे अर्थमंत्री पद कोणाकडे जाणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. राज्याचे अर्थमंत्री गेल्यानेच आता अर्थसंकल्प कोण सादर करणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? ( Who will Present Maharashtra Budget After Ajit Pawar)

राज्याच्या अर्थसंकल्प मार्च महिन्यात होतो. मागील सहा वर्षे सलग अजित पवार अर्थसंकल्प सादर करतात. दरम्यान, आता अजितदादांच्या निधनानंतर अर्थमंत्री कोण होणार आणि अर्थसंकल्प कोण सादर करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता

राज्याचे अर्थ खात्याचा कार्यभार हा मुख्यमंत्री देवंद्र फडणवीसांकडे जाऊ शकतो. देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजून याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अजित पवारांना मागील सलग ६ वर्षे अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, अजित पवारांनी आतापर्यंतचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत एकूण १० वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे जयंत पवार यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अधिवेशनात अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात. दर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतात. २०२६-२७ साठी अर्थसंकल्प कोण सादर करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

Ajit Pawar death : जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, महाराष्ट्रावर शोककळा

Tilauri Recipe : खुसखुशीत तिलोऱ्या कधी खाल्लात का? गावाकडे सणासुदीला खास बनवली जाते 'ही' रेसिपी

Ladki Bahin Yojana: ६५ वर्षांवरील अन् २१ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; या जिल्ह्यातील ९८ हजार महिलांची पडताळणी होणार

SCROLL FOR NEXT