Flight New Rule: Google
बिझनेस

Flight New Rule: विमान प्रवाशांसाठी खुशखबर! आता मुलांना मिळणार स्वतंत्र जागा

DGCA ने आदेश जारी करून विमान कंपन्यांना मुलांना जागा देण्यास सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

DGCA Orders Airlines to provide seat to children:

विमान प्रवास सोयीस्कर व्हावा, यासाठी विमान कंपन्या सतत नवनवीन सोयी सुविधा आणत असतात. पण विमान कंपन्या अनेक गोष्टींमध्ये मनमानीदेखील करत असतात. मग ते तिकीटदर असो किंवा मुलांना जागा देण्यावरून नेहमी वेगवेगळा नियम लागू करत असतात. विमानात मुलांना सीट देण्यावरून विमानातील क्रू सदस्य आणि प्रवाशांमध्ये खडाजंगी होत असते. नेहमी होणारी उद्भणारी ही समस्या लक्षात घेत DGCA याप्रकरणी नवी नियम अंमलात आणलाय.

विमान कंपन्यांना १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना जागा द्यावी लागणार असल्याचा नियम DGCAने लागू केलाय. एकाच पीएनआरवरुन पालकांसह मुलांना प्रवास करू देण्याची मुभा द्यावी लागेल. मुलांना किमान एक जागा द्यावी लागेल. याशिवाय सीट जागा वाटपाचा रेकॉर्डही कंपन्यांना ठेवावा लागणार आहे.

फ्लाइट रद्द झाल्यास पैसे मिळतात का ?

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) प्रवाशांच्या हितासाठी काही नियम आणलेत. फ्लाइट रद्द झाल्यास, एअरलाइन कंपनी एकतर पर्यायी उड्डाण देईल किंवा तिकिटाचे संपूर्ण पैसे परत करत असते. एवढेच नाही तर विमान कंपनी प्रवाशांना अतिरिक्त नुकसान भरपाईही देते.

फ्लाइटला उशीर झाला तर विमानाची वाट पाहणाऱ्यांना जेवण आणि अल्पोपहाराची सुविधाही दिली जाते. तसेच प्रवाशाला पर्यायी फ्लाइट, तिकीट किंवा हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा कंपन्याकडून दिली जाते. पण विमान कंपनीच्या नियंत्रणाबाहेरील असाधारण परिस्थितीमुळे उड्डाण रद्द किंवा विलंब झाल्यास ते नुकसान भरपाई देण्यास बांधील नसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

SCROLL FOR NEXT