Gold-Silver Price Today Saam tv
बिझनेस

Gold Rate Today : गौरी आगमनाला सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा सर्वात मोठी घसरण; २४, २२ अन् १८ कॅरेटचे नवीन दर जाहीर

Gold price today latest rate : गौरी आगमनाच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे नवीन दर जाणून घ्या. मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांतील ताजे भाव पाहा.

Namdeo Kumbhar

gold rate today Mumbai Pune : सोन्याची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. २२, २४ आणि १८ कॅरेटच्या सोन्याचे भाव स्वस्त झाले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ६०० रुपयांनी घसरण नोंदवण्यात आली आहे.

चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून आज देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत ही घट झाली आहे. त्यामुळे सण आणि लग्नसराईच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे.

आजच्या ताज्या दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव १ ग्रामसाठी १५,२९९ रुपये झाला असून त्यात ६० रुपयांची घसरण झाली आहे. तर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०० रुपयांनी कमी होऊन १,५२,९९० रुपये इतका झाला आहे. तसेच सर्वाधिक मागणी असलेल्या २२ कॅरेट सोन्याचा विचार केला असता, १ ग्राम सोन्याचा दर ५५ रुपयांनी घसरून १४,०२५ रुपये झाला आहे, तर १० ग्राम २२ कॅरेटसाठी ग्राहकांना १,४०,२५० रुपये मोजावे लागत आहेत. यात १० ग्राममागे ५५० रुपयांची कपात झाली आहे.

दुसरीकडे, १८ कॅरेट सोन्याच्या दरातही आज घसरण नोंदवली गेली आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा १ ग्रामचा भाव ११,४८३ रुपये असून त्यात ४० रुपयांची घट झाली आहे. तर १० ग्राम १८ कॅरेट सोन्याचा भाव ४०० रुपयांनी कमी होऊन १,१४,८३० रुपयांवर आला आहे. १०० ग्राम सोन्याचा विचार केल्यास २४ कॅरेटमध्ये थेट ६,००० रुपयांची, २२ कॅरेटमध्ये ५,५०० रुपयांची आणि १८ कॅरेटमध्ये ४,००० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे आज सोन्याच्या बाजारात ग्राहकांची पावले वळण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरात सोन्याचे दर काय? (प्रति ग्रॅम)

दिल्ली

२४ कॅरेट (२४K): ₹१५,२९९

२२ कॅरेट (२२K): ₹१४,०२५

१८ कॅरेट (१८K): ₹११,४८३

मुंबई

२४ कॅरेट (२४K): ₹१५,२८४

२२ कॅरेट (२२K): ₹१४,०१०

१८ कॅरेट (१८K): ₹११,४६३

अहमदाबाद

२४ कॅरेट (२४K): ₹१५,२८९

२२ कॅरेट (२२K): ₹१४,०१५

१८ कॅरेट (१८K): ₹११,४७३

लखनौ

२४ कॅरेट (२४K): ₹१५,२९९

२२ कॅरेट (२२K): ₹१४,०२५

१८ कॅरेट (१८K): ₹११,४८३

जयपूर

२४ कॅरेट (२४K): ₹१५,२९९

२२ कॅरेट (२२K): ₹१४,०२५

१८ कॅरेट (१८K): ₹११,४८३

पुणे

२४ कॅरेट (२४K): ₹१५,२८४

२२ कॅरेट (२२K): ₹१४,०१०

१८ कॅरेट (१८K): ₹११,४६३

कोलकाता

२४ कॅरेट (२४K): ₹१५,२८४

२२ कॅरेट (२२K): ₹१४,०१०

१८ कॅरेट (१८K): ₹११,४६३

मेरठ

२४ कॅरेट (२४K): ₹१५,२९९

२२ कॅरेट (२२K): ₹१४,०२५

१८ कॅरेट (१८K): ₹११,४८३

पटना

२४ कॅरेट (२४K): ₹१५,२८९

२२ कॅरेट (२२K): ₹१४,०१५

१८ कॅरेट (१८K): ₹११,४७३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मध्ये मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांचा राडा

Ganesh Visarjan : बाप्पाला निरोप देताना होत्याचे नव्हते झाले, एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा

Puran Poli Recipe : पहिल्याच प्रयत्नात बनवा मऊसूत पुरणपोळी; गणपतीला दाखवा नैवेद्य, चव चाखतच राहाल!

Diabetes and liver damage: शरीरात अचानक ही 5 लक्षणं दिसू लागली तर व्हा सावध; डायबेटीसमुळे लिव्हर होतंय खराब

India Fort : डोंगरावर नाही, चक्क सपाट जमिनीवर उभा आहे 'हा' अभेद्य किल्ला, तुम्ही कधी पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT