Aadhar Card Saam Tv
बिझनेस

Aadhar Card: आधार कार्ड क्रमांक नसतानाही सोप्या पद्धतीने करा eKYC; या स्टेप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aadhar Card eKYC Without Number:

प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे. आधार कार्ड ही भारतीय नागरिक असल्याची ओळख असते. आधार कार्डसाठी केवायसी करणे खूप जास्त महत्त्वाचे असते. केवायसी केल्यास तुमचे आधार कार्ड अपडेट राहिल. परंतु अनेकांना केवायसी करणे खूप जास्त अवघड वाटते. मात्र, केवायसी करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे.

आधार कार्ड केवायसी करण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचे असते. मात्र, आता आधार कार्डशिवाय तुम्हाला केवायसी करता येणार आहे. तुम्ही अगदी काही मिनिटातच आधार कार्ड केवायसी करु शकतात. केवायसी करण्याची प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

केवायसी म्हणजे काय?

केवायसी म्हणजे Know Your Customer. यात जन्मदिनांक, पत्ता आणि अनेक महत्त्वाची माहिती असते. सायबर क्राइम किंवा फ्रॉडपासून वाचण्यासाठी केवायसी करणे महत्त्वाचे असते.

बहुतेक ठिकाणी तुम्हाला केवासीसाठी आधार नंबर मागितला जातो. आधार नंबर देणे हे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळेच अनेकजण घाबरतात. त्यामुळेच व्हर्च्युअल आयडी वापरुन तुम्ही आधार कार्ड केवायसी करु शकता.

आधार कार्ड केवायसी करण्यासाठी प्रोसेस

सर्वप्रथम तुम्ही ब्राउझरमध्ये (https://myaadhaar.uidai.gov.in/offline-ekyc) ही लिंक उघडा.

तेथे तुम्हाला आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी टाकण्यास सांगितले जाईल. त्यावर सिक्युरिटूी कोड टाका. व्हर्च्युअल आयडी वापरल्यास तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार नाही.

यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला दाईल. हा ओटीपी व्हेरिफाईड झाल्यानंतर तुम्हाला XML फाइल डाउनलोड करण्याचा पर्याय येईल.

या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही UIDAI द्वारे डिजिटल साइन केलेली XML फाइल डाउनलोड केली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT