आधार कार्डावरचा पत्ता बदलण्यासाठी आता आधार सेवा केंद्रात जाऊन रांगेत उभं राहण्याची गरज नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकणाने (UIDAI) सुरू केलेल्या नवीन Aadhaar App मुळे आता घरबसल्या काही मिनिटांत आधारवरचा पत्ता अपडेट करता येणार आहे. त्यासाठी फक्त फेस ऑथेंटिकेशन आणि आवश्यक कागदपत्रांची गरज आहे.
शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या कारणाने अनेकांना शहर बदलावं लागतं. अशा वेळी आधार कार्डवरचा पत्ता सुधारणं आवश्यक असतं. याआधी ही प्रक्रिया करण्यासाठी आधार सेवा केंद्रात जावं लागत होतं. पण आता नवीन Aadhaar App मुळे ही प्रोसेस ऑनलाइन आणि जास्त सुरक्षित झाली आहे.
UIDAI ने ३० जून २०२६ पासून जुने mAadhaar App बंद करून त्याऐवजी नवीन Aadhaar App सेवा सुरू करून दिली आहे. हे अॅप Google Play Store आणि Apple App Store वर तुम्हाला मिळेल. या अॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशनसारखे आधुनिक सुरक्षा फीचर्स देण्यात आलेले आहे. त्यामुळे पडताळणी जास्त वेगाने आणि सुरक्षित होते.
सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये नवीन Aadhaar App डाउनलोड करून त्याची नोंदणी पूर्ण करा. त्यानंतर अॅप उघडून Services या ऑप्शनवर क्लिक करा. पुढे Address Update हा पर्याय निवडा. आता तुमचा सध्याचा पत्ता दिसेल. त्याखाली नवीन पत्ता अपडेट करण्यासाठी दोन पर्याय मिळतील.
पहिल्यामध्ये नवीन पत्त्याचा पुरावा (Address Proof) अपलोड करून पत्ता बदलता येतो. दुसऱ्या पर्यायात कुटुंबातल्या सदस्याच्या आधार कार्डाच्या मदतीनेही पत्ता अपडेट करता येतो. पुढे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७५ शुल्क ऑनलाइन भरावे लागते.पेमेंट झाल्यावर तुम्हाला Service Request Number (SRN) मिळेल. या क्रमांकाच्या मदतीने अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासता येते.
UIDAI च्या माहितीनुसार, पत्ता अपडेट होण्यासाठी साधारण १५ दिवसांचा कालावधीलागू शकतो. सर्व कागदपत्रे नीट असतील तर कोणत्याही आधार केंद्रात न जाता घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यामुळे नुकतंच नवीन जागी राहायला गेलेल्या नागरिकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.