Success Story saam tv
बिझनेस

Success Story: एका ड्रिंकनं डोकं झणाणलं; देसी ड्रिंकला ब्रँड बनवून ३ भाऊ झाले कोट्यवधींच्या कंपनीचे मालक

Success Story : एका जीऱ्याच्या ड्रिंकने तीन भावांचं संपूर्ण आयुष्यचं बदलून टाकलं आहे. जाणून घेऊया या ३ भावांची यशोगाथा

Surabhi Jayashree Jagdish

एका जीऱ्याच्या ड्रिंकने तीन भावांचं संपूर्ण आयुष्यचं बदलून टाकलं आहे. पंजाबमधील सौरभ मुंजाल याने त्याचे दोन भाऊ सौरभ भुतना आणि निखिल डोडा यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी 'लाहोरी जीरा' सुरू केलं. लाहोरी जीरा हे एक हेल्दी देसी ड्रिंक ब्रँड आहे. या ३ भावांचा हा बिझनेस इतका सुसाट आहे की, लाहोरी जिऱ्याच्या 20 लाख बाटल्या दररोज बनवल्या जातात.

आपण एकंदरीत पाहिलं तर भारतात, देसी ड्रिंक्स क्षेत्रात फारशी स्पर्धा नाहीये. हाच विचार सौरभने केला. या बिझनेसच्या माध्यमातून 1000 कोटींचे उत्पन्न मिळवण्याचं त्याचं स्वप्न आहे. जाणून घेऊया सौरभच्या या यशोगाथेबद्दल

एमबीए शिकलाय सौरभ

सौरभ मुंजालने एमबीए पदवी घेतली असून 2012 मध्ये त्यांनी स्वतःचा ट्रेड फायनान्स बिझनेस सुरू केला. यानंतर सौरभने हेरिटेज हवेली नावाचा हॉस्पिटॅलिटीचा बिझनेस देखील सुरू केला. त्यानंतर 2017 मध्ये निखिल मुंजाल आणि सौरभ भुतना या भावांनी आर्चियन फूड्स सुरु केलं. ही 'लाहोरी जीरा'ची मूळ कंपनी आहे.

कशी सुचली बिझनेसची आईडिया?

लाहोरी जीराची कहाणी निखिलच्या घरी बनवलेल्या जीरा ड्रिंकने सुरू झाली. सौरभ मुंजाल आणि सौरभ भुतना यांनी ज्यावेळी हे ड्रिंक टेस्टकेलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ही एक उत्तम बिझनेस आयडिया असू शकते. मार्केटमध्ये नॅचरल डेसर्ट ड्रिंक फारसे नाहीत. ही कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी लाहोरी जीरा सुरू केलं. लाहोरी जिराचं नाव त्याच्या मुख्य इंग्रीडिएंट रॉक सॉल्टने प्रेरित आहे. 'लाहोरी' हा शब्द याच्याशी संबंधित आहे. हे एक वेगळं नॉन-अल्कोहोल ड्रिंक आहे.

इतर हानिकारक पेयांना एक उत्तम पर्याय

लाहोरी जीरा ही अनोखी देसी लोकांना फार आवडली आहे. हे ड्रिंक चहा, कॉफी आणि कोला यांसारख्या पारंपारिक ड्रिंक्सना उत्तम पर्याय बनलंय. या ड्रिंकची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने बाटली पॅकेजिंगसाठी पूर्णपणे ऑटोमॅटिक प्रोसेस वापरून दररोज अधिक बाटल्यांचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतलाय.

कोटींच्या कंपनीचे मालक

आता लाहोरी जिऱ्याशिवाय लिंबू, कच्चा आंबा, शिकंजी आणि चिंचेच्या फ्लेवरमध्येही ते उपलब्ध आहे. सध्या कंपनी दररोज 20 लाखांहून अधिक बाटल्यांचे प्रोडक्शन करते. लाहोरी जीराने 2021 मध्ये 80 कोटी रुपयांची कमाई केली होती, जी 2022 मध्ये वाढून 250 कोटी रुपये झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT