8th Pay Commission  saam tv
बिझनेस

8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पूर्वी रिटायर झालात? मग ८व्या वेतन आयोगाचा फायदा मिळणार की नाही? लगेचच घ्या जाणून

8th CPC Pension News: आठव्या वेतन आयोगामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार का? पात्रता आणि महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाची चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. १ जानेवारी २०२६ आधी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन मिळेल का? तसेच वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांना थकबाकीचा मिळेल का, याबद्दल त्यांच्यात उत्सुकता आहे. पण यावर सरकराने अधिकृत निर्णय घेतलेला नाही.

१ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता

आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सरकारने या तारखेपासून मागच्या प्रभावाने वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतल्यावर काही रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकीचा लाभ मिळू शकतो.

उदाहरणार्थ, एखादा कर्मचारी २०२७ मध्ये रिटायर झाला आणि सरकारने वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू केला, तर त्याला १ जानेवारी २०२६ ते रिटायरमेंटच्या तारखेपर्यंतच्या जुन्या आणि सुधारित वेतनातल्या फरकाची थकबाकी मिळू शकते. पण हे सरकारच्या अंतिम नियमांवर अवलंबून असेल.

आधीच रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार?

आठव्या वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्रात पेन्शनशी संबंधित मुद्द्यांचाही समावेश आहे. त्यामुळे सरकारने पेन्शन वाढवण्याच्या शिफारशी स्वीकारल्यावर आधीच रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांनाही सुधारित मासिक पेन्शनचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेची महत्त्वाची मागणी

रिटायर्ड एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनने (REWA) सप्टेंबर २०२६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून (REWA) रिटायर कर्मचाऱ्यांनाही आठव्या वेतन आयोगाच्या कक्षेत एकत्र करण्याची मागणी केली होती.

आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये बदल करून १ जानेवारी २०२६ आधी रिटायर झालेले पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शन घेणाऱ्यांनाही पेन्शन सुधारणेचा लाभ मिळावा, अशी संघटनेची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Refrigerator Colour Vastu: घरात फ्रिज कोणत्या रंगाचा असावा? रंगानुसार घरात पडतो पैशांचा पाऊस; वास्तुशास्त्रात सांगितलेत नियम

Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

Maharashtra News Live Update: 2029 पंढरपूरमध्ये विहिरीचा कठडा कोसळून अपघात, चार मजूर अडकल्याची भीती

Death News: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; कर्करोगामुळे लेकीचे निधन

Ginger And Turmeric Drink: सकाळी आलं आणि हळदीचे पाणी प्यायल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT