8th Pay Commission  meta ai
बिझनेस

8th Pay Commission : 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार? NC-JCM ने सांगितलं सत्य

Pension Update : आठव्या वेतन आयोगानंतर रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार असल्याचा दावा व्हायरल होत आहे. मात्र NC-JCM महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी हा दावा चुकीचा आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे व्हायरल होत आहेत. २०२६ नंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच पेन्शन सुधारण्याचा लाभ मिळेल, तर आधीच रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होईल, असा दावा काही संदेशांमधून केला जातोय. मात्र या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

नॅशनल कौन्सिल (JCM) स्टाफ साइडचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी व्हायरल दाव्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. शनिवारी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून मेसेज त्यांनी दिला. बरेच रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधून सोशल मीडियावर फिरत असलेल्या संदेशांबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर मिश्रा यांनी हे दावे पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे सांगितले.

रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार नाही

मिश्रा यांच्या नावाने सोशल मीडियावर काही संदेश प्रसारित केले जातायेत. या संदेशांमध्ये पेन्शनर्सची पेन्शन बंद होऊ शकते किंवा २०२६ नंतर रिटायर होणाऱ्यांनाच पेन्शन आणि त्यातल्या सुधारणांचा लाभ मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

आठव्या वेतन आयोात पेन्शनवर चर्चा सुरू

मिश्रा यांच्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगामध्ये पेन्शनशी संबंधित विविध मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू आहे. आधीच रिटायर झालेले पेंशनर्स तसेच भविष्यात रिटायर होणारे कर्मचारी यांना पेन्शन मिळत राहील आणि त्यात वेळोवेळी सुधारणा होत राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या

सोशल मीडियावर पसरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास न ठेवता, पेन्शनर्सनी युनियनच्या अधिकृत हँडलवरून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावं, असा सल्ला मिश्रा यांनी दिला आहे. चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांना महत्त्व देण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आठव्या वेतन आयोगानंतर रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार असल्याच्या चर्चांमुळे पेन्शनर्सनी घाबरून जाण्याची गरज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT