8th Pay Commission saam tv
बिझनेस

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 18 हजारांचा पगार थेट 69 हजार होणार? वाचा अपडेट्स

8th Pay Commission Salary Hike 2026 : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८ हजारांवरून ६९ हजार रुपये करण्याची मागणी झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

देशातल्या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांनाही बसतोय. अशातच आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची चर्चा सुरू झालेली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८ हजार रुपयांवरून थेट ६९ हजार रुपये करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली. ऑक्टोबर २०२६ मध्ये देशातल्या किरकोळ महागाईचा दर ६.०९ टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. पण वाढती महागाई म्हणजे पगारवाढीची हमी आहे का? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

कर्मचाऱ्यांची नेमकी मागणी काय?

नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (NC-JCM) या कर्मचारी संघटनेने आठव्या वेतन आयोगासमोर महत्त्वाची मागणी मांडली. त्यामध्ये सध्या सातव्या वेतन आयोगानुसार बेसिक सॅलरी १८ हजार रुपये आहे. ती वाढवून ६९ हजार रुपये करावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी ३.८३३ फिटमेंट फॅक्टर सुचवण्यात आला आहे. इतर कर्मचारी संघटनांकडूनही ३ ते ४.३८ पर्यंत फिटमेंट फॅक्टरची मागणी होतेय.

महागाईचा जास्त फटका कोणाला बसणार?

तज्ज्ञांच्या मते, वाढच्या महागाईचा जास्त फटका कमी सॅलरी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि निश्चित पेन्शनवर अवलंबून असलेल्या जेष्ठ नागरिकांवर होतो. अन्नधान्य आणि दैनंदिन गरजांच्या वस्तू महागल्यामुळे त्यांच्या मासिक खर्चात वाढ होते.

महागाई वाढली म्हणजे फिटमेंट फॅक्टर वाढतो का?

तज्ज्ञांच्या मते, महागाई वाढल्यामुळे कर्मचारी संघटनांची बाजू मजबूत होऊ शकते. पण फक्त महागाईच्या एका आकड्यावरून फिटमेंट फॅक्टर ठरत नाही. सरकारचा आर्थिक भार, सध्याचा महागाई भत्ता (DA), कर्मचाऱ्यांची सॅलरी आणि दीर्घकालीन महागाईचा विचार केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये गावगुंडाची दहशत; दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

Kothimbir Cream Soup: हिवाळ्यात घ्या गरमागरम कोथिंबीर क्रीम सूपचा आस्वाद; घरी बनवा रेस्टॉरंटसारखे चविष्ट सूप!

Kidney Damage : तुम्ही वरवर दिसायला एकदम फिट दिसता, पण 'या' ७ दररोजच्या वाईट सवयी ठरतात किडनीसाठी धोकादायक

Mohammed Shami: मोठा उलटफेर! मोहम्मद शमी नव्या संघाकडून खेळणार, बदल्यात लखनऊला 2 खेळाडू मिळणार? कोणत्या खेळाडूंची नावं चर्चेत?

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार, प्रवाशाच्या छातीत चाकू खुपसला

SCROLL FOR NEXT