8th Pay Commission  google
बिझनेस

8th Pay Commission : सरकारने या फिटमेंट फॅक्टरला मंजुरी दिली तर कर्मचाऱ्यांचा पगार थेट ₹51000 होणार? समजून घ्या कॅलक्युलेशन

Fitment Factor Calculation : आठव्या वेतन आयोगात 3.83 फिटमेंट फॅक्टर मंजूर झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत मोठी वाढ होऊ शकते. 51 हजार वाढीचं गणित काय आहे आणि सरकारची भूमिका जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोग (8th Pay Commission) हा चर्चेचा विषय आहे. अजूनही वेतन लागू झालेलं नसलं तरी त्यासंदर्भात सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. देशातल्या एक कोटीहून जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.

कर्मचारी संघटनांनी सरकारकडे बऱ्याच मागण्या केल्या आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे, फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) २.५७ वरून ३.८३ करण्याची आहे. संघटनांचं म्हणणं आहे की, गेल्या काही वर्षामध्ये वाढलेल्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वास्तविक मुल्य कमी झाले आहे. त्यामुळे नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवणं गरजेचं आहे.

सध्या सरकार कर्मचारी संघटना आणि संबंधित विभागांशी चर्चा करताना पाहायला मिळतय. प्रसारित झालेल्या माहितीनुसार, अनेक बैठका पार पडलेल्या आहेत. आता अंतिम अहवाल मंत्रिगटाकडे (GoM) पाठवला जाणार आहे. त्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेईल.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे कर्मचाऱ्यांची नवीन बेसिक सॅलरी ठरवण्यासाठी वापरला जाणारा गुणांक. याच फॅक्टरच्या आधारावर पगार, पेन्शन आणि इतर आर्थिक लाभ ठरवले जातात. त्यामुळे यामध्ये बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर होतो.

सध्या सातव्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे आणि बेसिक सॅलरी १८००० आहे. जर आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनांची मागणी मान्य करून फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्यात आला, तर गणितानुसार ६३,९४० इतकी बेसिक सॅलरीत वाढ होऊ शकते. म्हणजेच सध्याच्या बेसिक सॅलरीच्या तुलनेत ५१ हजारांची वाढ दिसू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banking fraud: OTP न सांगताही बँक खातं रिकामं होऊ शकतं? स्कॅमर्सच्या नव्या युक्तीने होईल नुकसान

भारतात डेंग्यूच्या पहिल्या लशीला मंजुरी, डेंग्यूपासून लवकरच सुटका होणार

सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनात धडकल्या, स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

दिल्लीतील आंदोलक आतंकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचं डोकं ठिकाणावर आहे का?

Maharashtra News Live Update: सोनिया गांधी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलिस स्टेशनला पोहोचल्या

SCROLL FOR NEXT