8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट

8th Pay Comission update: सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाचं काम कसं सुरु आहे याबाबत अर्थ मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

आठव्या वेतन आयोगाचं काम कसं सुरु?

अर्थमंत्रालयाने दिली सर्व माहिती

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे. या वेतन आयोगाबाबत अर्थ मंत्रालयाने संसदेत माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, आठव्या वेतन आयोगासाठी अधिकृत काम सुरु झाले आहे. येत्या काळात पगार, भत्ते आणि पेन्शनमध्ये बदल होऊ शकतो. लोकसभेत याबाबत सरकारने माहिति दिली. आठव्या वेतन आयोगाची टाइमलाइन, काम आणि संभाव्य तारखेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

सरकारच्या मते, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केला. या समितीच्या अध्यक्ष माजी न्यायमूर्ती रंजना प्रताश देशाई आहेत. पुलक घोष हे पार्ट टाइम सदस्य आहेत. पंकज जैन हे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. या वेतन आयोगाच्या समितीचे काम वेतन रचना, भत्ता आणि पेन्शनबाबत शिफारसी तयार करणे आहेत.

अर्थमंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती (8th Pay Commission Impoartant Update)

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, वेतन आयोगाच्या समितीला १८ महिन्याचा वेळ दिला आहे. म्हणजेच २०२७ मध्ये शिफारसी लागू होऊ शकतात. दरम्यान, शिफारसी लागू झाल्यानंतर अंतिम निर्ण केंद्र सरकार घेणार आहे. त्यानंतरच कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे.

सध्या आठव्या वेतन आयोगासाठी किती निधी लागेल, सरकारी तिजोरीवर किती ताण पडेल, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही सर्व माहिती शिफारसी लागू झाल्यानंतर समजणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांची मते लक्षात घेतली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सूचनांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमचे मत मांडायचे आहे. MyGov वेबसाइटवर जाऊन माहिती द्यायची आहे. यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार; भाजप सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Pratap Sarnaik: अखेर पालीकरांचे स्वप्न पूर्ण! अत्याधुनिक बसस्थानक उभारणार; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: मराठा अभ्यासक आणि सरकारच्या शिष्टमंडळमध्ये चर्चा सुरू

Shocking: पैशांच्या हव्यासापोटी आईनेच केली पोटच्या दोन मुलांची विक्री, तिघांना अटक; प्रियकर फरार

SCROLL FOR NEXT