8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: शिपाई ते IAS अधिकारी; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर ८.३३ करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, जर फिटमेंट फॅक्टर ८.३३ झाला तर कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार ते जाणून घ्या.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर ८.३३ करण्याची मागणी

कोणत्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ किती होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न पडला आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते.दरम्यान, फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली जात आहे. सध्या कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर ८.३३ करण्याची मागणी केली आहे.

फिटमेंट फॅक्टर वाढल्यानंतर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. नवी दिल्लीत २८ ते ३० एप्रिलदरम्यान नॅशनल काउंसिलच्या स्टाफ साइडने मागणी केली आहे. बेसिक सॅलरी १८००० रुपयांवरुन ६९००० पर्यंत करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. त्यानंतर कर्मचारी संघटना फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याची मागणी करत आहेत.

जर फिटमेंट फॅक्टर ३.८३ लागू झाला तर बेसिक सॅलरी १८००० रुपयांवरुन ६८,९४० रुपये होऊ शकते.कर्मचाऱ्यांची पेन्शनदेखील वाढू शकते. प्रत्येक लेव्हलनुसार कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन वाढणार आहे. लेव्हल २ कर्मचाऱ्यांचा पगार १९,९०० रुपयांवरुन ७६ हजारांवर जाऊ शकतो.

आठव्या वेतन आयोगात किती वाढणार पगार? (8th Pay Commission Salary Hike Update)

लेव्हल १ कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई आणि अटेंडंटचा समावेश होतो. लेवल २ मध्ये लोअर डिवीजन, लेव्हल ३ मध्ये कॉन्स्टेबल आणि कुशल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लेव्हल ४ मध्ये स्टेनोग्राफर आणि ज्युनिअर क्लार्कचा समावेश होतो.

लेव्हल १- बेसिक सॅलरी १८००० रुपयांवरुन ६९००० रुपये

लेव्हल २ कर्मचाऱ्यांचा पगार १९,९०० रुपयांवरुन ७६,००० रुपये

लेव्हल ३ कर्मचाऱ्यांना २१,७०० रुपयांवरुन ८३,००० रुपये

लेव्हल ४ कर्मचाऱ्यांना २५,५०० रुपयांवरुन ९७,००० रुपये

लेव्हल ५ कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी २९,२०० रुपयांवरुन १.११ लाख रुपये

लेव्हल ६ कर्मचाऱ्यांचा पगार ३५,४०० रुपयांवरुन १,३५ लाख रुपये

लेव्हल ७ कर्मचाऱ्यांचा पगार ४४,९०० रुपयांवरुन १.७२ लाख रुपये

लेव्हल ८ कर्मचाऱ्यांना ४७,६०० रुपयांवरुन १.८२ लाख रुपये

लेव्हल ९ कर्मचाऱ्यांचा पगार ५३,१०० रुपयांवरुन २.०३ लाख रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Sunday Horoscope : जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT