8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: कामाची बातमी! जानेवारीपासून तुमचा पगार कितीने वाढणार? एरियर कधीपर्यंत येणार?

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ लवकरच लागू केली जाणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून हा नवीन वेतन आयोग लागू होणार आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

१ जानेवारीपासून लागू होणार नवीन वेतन आयोग

पगार कितीने वाढणार?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाचे असणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. हा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. मात्र, नवीन वेतन आयोगाअंतर्गत येणारी पगारवाढ काही दिवसांनी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कारण अजूनही आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आठवा वेतन आयोगात कधी मिळणार पगारवाढ? (Salary Hike Under 8th Pay Commission)

आठव्या वेतन आयोगाची अंबलबजावणी झाल्यानंतर लगेचच कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन आणि एरियर दिले जातील. याआधीही नवीन वेतन आणि एरियर कर्मचाऱ्यांना मिळण्यास उशिर झाला आहे. ७ वा वेतन आयोग ३१ डिसेंबर २००२५ रोजी संपणार आहे. त्यानंतर नवीन वेतन आयोगाची सुरुवात होईल. दरम्यान, या वेतन आयोगात पगारवाढ कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष वेतन वाढ येण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे. यानंतर शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. या शिफारसी मंजुर झाल्यानंतर नवीन वेतन आयोग लागू होईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे.

पगारवाढ किती मिळणार?

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती असणार यावर चर्चा होईल. अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याआधीच्या वेतन आयोग आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावर पगारवाढ दिली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT