8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? पगारवाढ कधी येणार? वाचा सविस्तर

8th Pay Commission Implementation Date: सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. यासाठी शिफारसी सादर करण्यास सांगितले आहे.

Siddhi Hande

आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार

कर्मचाऱ्यांना पगारवाढ कधी मिळणार?

वाचा आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची माहिती

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती मिळणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, याचसोबत वेतन आयोग कधीपासून लागू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी २०२५ मध्ये टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केले. यानुसार आता समिती शिफारसी तयार करणार आहेत. यासाठी १८ महिन्यात शिफारसी तयार करण्यास सांगितले आहे.

आठव्या वेतन आयोगात नवीन पगारवाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आठव्या वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर १८ महिन्यात शिफारसी सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर वेतन आयोग लागू केला जाईल. परंतु जेव्हा शिफारसी सादर होऊन केंद्राकडून मंजुरी मिळेल त्या दिवसापासून ते १ जानेवारी २०२६ पासून नवीन वेतन आयोग लागू होईल याबबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना प्रश्न पडले आहेत.

आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? (8th Pay Commission Implementation Date)

मागील वेतन आयोगानुसार, ६व्या वेतन आयोगाची रिपोर्ट २००८ मध्ये दिला होता. परंतु वेतन आयोग १ जानेवारी २००६ पासून लागू झाला होता. ७व्या वेतन आयोगातदेखील दीड वर्षांचा कालावधी लागला होता. परंतु वेतन आयोग त्याच तारखेपासून लागू झाला होता. दरम्यान, आताही आठव्या वेतन आयोगात शिफारसी लागू होण्यास उशिर होऊ शकतो. परंतु वेतन आयोग हा १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.

कर्मचाऱ्यांना सूचना सादर करण्यास सांगितले

आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. शिफारसी तयार करताना कर्मचाऱ्यांच्या मतांचाही विचार केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना सादर करण्यासाठी सांगितल्या आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्मचाऱ्यांना सूचना सादर करायच्या आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची मते विचारात घेऊन शिफारसी सादर केल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेची उद्या पोटनिवडणूक

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

'पाणी द्या, अन्यथा...'; डोंबिवलीकरांचा पाणीटंचाईवरून संताप, महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा

High blood pressure: सकाळी तुमच्या या ३ सवयींमुळे वाढतोय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल

SCROLL FOR NEXT