8th Pay Commission saam tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 मोठे अपडेट! पगारवाढीबाबत आली महत्त्वाची बातमी

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगाच्या वेबसाइटवर पाच महत्त्वाचे अपडेट प्रसिद्ध झाले आहेत. कर्मचारी संघटनांच्या बैठका, पगारवाढ, फिटमेंट फॅक्टरबाबत काय घडणार? जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होईल, फिटमेंट फॅक्टर किती असेल आणि पेन्शनमध्ये काय बदल होईल, याकडे लाखो कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आठव्या वेतन आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर ५ महत्त्वाचे अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेत. त्यामुळे आयोगाच्या पुढच्या कामकाजाबद्दलची उत्सुकता वाढलेली आहे.

आठव्या वेतन आयोगाच्या वेबसाइटवरचे ५ महत्त्वाचे अपडेट

१. मुंबईत कर्मचारी संघटनांसोबत बैठक

आयोगाने २२ आणि २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत बैठका घेतल्या. यावेळेस वेगवेगळ्या कर्मचारी संघटना आणि संबंधित प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. वेतनवाढ, पेन्शन आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत त्यांची मतं जाणून घेतली.

२. बंगळुरूमध्येही चर्चा

आयोगाने याआधी ७ आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी बंगळुरूचा दौरा केला होता. यावेळी कर्मचारी संघटनांना त्यांच्या मागण्या आणि सूचना मांडण्याची संधी देण्यात आली. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर होती.

३. सल्लागारांच्या नियुक्तीच्या नियमात बदल

११ ऑगस्ट २०२६ रोजी आयोगाने सल्लागारांच्या नियुक्तीसंदर्भातले मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले. अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञांची मदत घेणं हा यामागचा उद्देश आहे.

४. जयपूरमध्ये कर्मचारी संघटनांशी चर्चा

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२६ रोजी जयपूरमध्ये बैठका घेण्यात आल्या. राजस्थानमधल्या कर्मचारी संघटनांकडून वेतन आणि पेन्शनविषयक सूचना जाणून घेतल्या.

५. चंदीगडमध्येही महत्त्वाची बैठक

१६ आणि १७ सप्टेंबर २०२६ रोजी चंदीगडमध्ये आयोगाने कर्मचारी प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळेस पगारवाढ आणि पेन्शनसंबंधी मागण्या मांडण्याची संधी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana: बॉक्स ऑफिसवर रणबीरच्या 'रामायण'ची महागर्जना! ११ व्या दिवशी कमावले ७५ कोटी, केला 'धुरंधर'चा चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक

Maharashtra News Live Update: आंबे येथील विहीर दुर्घटनेतील चौघांचे मृतदेह सापडले; २४ तासांनंतर शोधमोहीम समाप्त

जय शाह यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी! दुसऱ्यांदा ICC अध्यक्षपदी बिनविरोध निवड, आता क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल?

Migraine Home Remedies: मायग्रेनचा त्रास होताच तुम्हीही करता का हे घरगुती उपाय? डॉक्टरांनी सांगितलं, कोणते उपाय खरंच ठरतात फायदेशीर!

Combined Toilet and Bathroom Vastu Tips for Home: घरामध्ये टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असावे की नाही? वास्तुशास्त्राचे नियम काय सांगतात?

SCROLL FOR NEXT