8th Pay Commission  meta ai
बिझनेस

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगामुळे २२,४५० पेन्शन ५७,६९७ होईल का? २.५७ फिटमेंट फॅक्टरनुसार हे गणित कसे होते, अंतिम निर्णय कोण घेणार आणि पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या आठव्या वेतनाची जोरदार चर्चा सुरू आहे. पेन्शनमध्ये किती वाढ होईल, याकडे सर्वांचं लक्ष आहे. सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या अहवालांमध्ये २.५७ फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सध्याची २२,४५० रुपयांची पेन्शन वाढून ५७,६९७ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र हा फक्त उदाहरणावर आधारित अंदाज असून सरकारने अद्याप पेन्शनची कोणतीही अंतिम रक्कम जाहीर केलेली नाही.

केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या या आयोगाला कर्मचारी, वेतन , भत्ते आणि पेन्शनमध्ये बदलाबद्दल शिफारसी करायच्या आहेत. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

आयोगाच्या बैठका विविध शहरांमध्ये होत आहेत. चेन्नईनंतर ९ सप्टेंबरला पुडुचेरी, १६ सप्टेंबरला चंदीगड आणि ७ ऑक्टोबरपासून बंगळुरूमध्ये बैठका होणार आहेत. या बैठकींमध्ये कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या विविध मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पेन्शनर्सच्या प्रमुख मागण्या काय?

काही कर्मचारी आणि पेन्शन संघटनांकडून जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत शेवटच्या वेतनात ५० टक्क्यांच्याऐवजी ६७ टक्के पेन्शन देण्याची मागणी केली जात आहे. तसेच फॅमिली पेन्शन ५० टक्क्यांपर्यंत वाढवावी आणि नागरी पेन्शनर्सना वन रँक, वन पेन्शनसारखा लाभ द्यायला हवा अशी मागणी आहे.

₹५७,६९७ चा आकडा कसा आला?

२२,४५० या पेन्शनला २.५७ या फिटमेंट फॅक्टरने गुणल्यावर ५७,६९७ रक्कम मिळते. मात्र, याचा अर्थ पेन्शन एवढीच होणार असं नाही. आठव्या वेतन आयोगात २.५७, २.२८, २.१५ फिटमेंट १५ किंवा त्याहून जास्त फिटमेंट फॅक्टर ठरू शकतो. काही संघटनांकडून ३.८ ते ४ पट फिटमेंट फॅक्टरची मागणीही होत आहे.

सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर वापरण्यात आला होता. त्यामुळे याच्याच आधारावर आठव्या वेतन आयोगाबाबत अंदाज व्यक्त केलं जातं. अंतिम निर्णय मात्र आयोगाच्या शिफारसी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होईल.

सध्याच्या वेळापत्रकानुसार आयोगाला २०२७ च्या मध्यापर्यंत अहवास सादर करायचा आहे. त्यामुळे सध्या ५७,६९७ पेन्शन निश्चित मानणे योग्य ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

SCROLL FOR NEXT