Small Village Hotel Earns Nearly ₹2 Lakh a Month Saam TV marathi
बिझनेस

फक्त १०० रुपयांची थाळी अन् महिन्याला २ लाखांची कमाई, गावाकडच्या छोट्या हॉटेलचा भन्नाट फॉर्म्युला

thali business model : गुजरातमधील एका छोट्या खानावळीत फक्त १०० रुपयांत पोटभर शाकाहारी थाळी मिळते. पती-पत्नीच्या मेहनतीतून ४० हून अधिक टिफिन आणि दरमहा जवळपास २ लाखांची उलाढाल कशी होते, जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

how small hotels make ₹2 lakh monthly turnover : गावाजवळील एका वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरचं एक छोटंसं खानावळ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. कुठलाही हायफाय सेटअप किंवा महागड्या जाहिराती नसताना, फक्त एका पती-पत्नीच्या जोडीने आपल्या कष्ट आणि युक्तीच्या जोरावर या व्यवसायाला भक्कम उभं केलंय. महिन्याला दोन लाखांपर्यंत त्यांची कमाई होते. गावाकडच्या छोट्या हॉटेलचा भन्नाट फॉर्म्युला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गुजरातमधील एका गावाजवळील मुख्य रस्त्यावर हे पती-पत्नी एक छोटेसे हॉटेल चालवतात. ते फक्त १०० रुपयांत सकस आणि पोटभर शाकाहारी थाळी देतात. रोज २५ हून अधिक ग्राहक हॉटेलमध्ये तर ४० हून अधिक टिफिन शेतकरी आणि वृद्धांपर्यंत पोहोचवले जातात. स्वतःच्या शेतातील भाज्या आणि स्वतःच बनवलेलं जेवण यामुळे कोणताही अतिरिक्त खर्च न होता ते महिन्याला १ लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा (Profit) कमवत आहेत. व्यवसायाची ही भन्नाट आणि सोपी संकल्पना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'एक्स' (ट्विटर) युझर नलिनी उनागर यांनी या दुकानाला प्रत्यक्ष भेट दिली, त्यावेळी सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली. नलिनी उनागर यांनी सांगितलेले आकडे आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहून भलेभले चक्रावून गेले. गावाकडच्या रस्त्या कडेला असणारं हे छोटंसं दुकान महिन्याला २ लाखांची उलाढाल कशी करतंय, हे चर्चेचा विषय आहे.

१०० रुपयांच्या थाळीत काय आहे?

दुकानाचा संपूर्ण व्यवसाय हा साध्या पदार्थावर आधारित आहे. १०० रुपयांची शाकाहारी थाळी मिळते. त्यामध्ये दोन भाज्या, चपाती, डाळ, भात, पापड आणि सॅलड यांचा समावेश असतो. माफक किंमत आणि गावाजवळ असूनही या दुकानाने एक स्थिर आणि निष्ठावान ग्राहक जोडला आहे. दररोज सरासरी ६५ जण त्यांच्याकडे जेवण करतात. २५ हून अधिक ग्राहक हॉटेलमध्ये तर ४० हून अधिक टिफिन असतात. शेतकरी आणि वृद्धांपर्यंत टिफिनची सोय करण्यात आली आहे.

ग्राहकांची थेट जोड आणि टिफिन सर्व्हिस

मुख्य रस्त्यावर दुकान असल्याने दररोज २५ हून अधिक ग्राहक प्रत्यक्ष खानावळीत येऊन जेवतात. पण टिफिन व्यवसाय खरा गेमचेंजर ठरलाय. गावाकडच्या भागात दररोज तब्बल ४० हून अधिक डब्यांच्या निश्चित ऑर्डर्स मिळतात. हे डबे प्रामुख्याने शेतात काम करणारे मजूर आणि घरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक मागवतात. स्वतः स्वयंपाक करण्याच्या त्रासापेक्षा गरम, स्वच्छ आणि परवडणारं जेवण मिळत असल्याने हे ग्राहक कायमस्वरूपी जोडले गेले आहेत.

दिवसाची विक्री आणि महिन्याची उलाढाल

रोजची विक्री: २५ (हॉटेलमधील ग्राहक) + ४० (टिफिन) = ६५ थाळ्या

दररोजचे उत्पन्न: ६५ थाळ्या × ₹१०० = ₹६,५००

महिन्याची एकूण उलाढाल: ₹६,५०० × ३० दिवस = सुमारे ₹१.९५ लाख

जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं सिक्रेट

हा व्यवसाय इतका यशस्वी होण्यामागे त्यांची काटकसर आणि स्मार्ट नियोजन आहे. पती-पत्नी दोघेच सर्व स्वयंपाक आणि मॅनेजमेंट सांभाळतात, त्यामुळे कामगारांच्या पगाराचा खर्च शून्य होतो. लागणाऱ्या भाज्या ते स्वतःच्या छोट्या शेतात पिकवतात. त्यामुळे कच्च्या मालाचा (भाजीपाल्याचा) मोठा खर्च वाचतो. त्यामुळे कमी खर्च आणि उत्तम नियोजनामुळे हा व्यवसाय ६०% पेक्षा जास्त नफ्याच्या मार्जिनवर (Profit Margin) चालतो. सर्व खर्च वजा करून दरमहा ₹१ लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा (Net Profit) मिळवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT