Tax Saving Tips Google
बिझनेस

Tax Saving Tips: खुशखबर! वर्षाला १० लाख कमावले तरीही भरावा लागणार नाही टॅक्स; आकडेमोड समजून घ्या

How to Save Tax On 10 Lakh+ Income: नवीन करप्रणालीत सरकारने बदल केला आहे. त्यामुळे ७.७५ लाख रुपये उत्पन्न असल्यास तुम्हाला कर भरावा लागणार नाही. याचसोबत तुम्हाला १० लाख रुपये उत्पन्न असल्यावरदेखील कर भरण्याची गरज नाही.

Siddhi Hande

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी २३ जुलैला देशाचे अर्थसंकल्प सादर केले. यामध्ये अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणालीत सवलत देण्याची घोषणा केली. अर्थमंत्र्‍यांनी टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला आहे. त्यांनी स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ केली आहे. स्टँडर्ड डिडक्शन ५०,००० रुपयांवरुन ७५,००० रुपये केले आहे. त्यामुळे ७.७५ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना कर द्यावा लागणार नाही. परंतु तुम्ही १० लाखांच्या उत्पन्नांवरदेखील तुम्ही कर वाचवू शकतात. कसं ते जाणून घ्या.

जर तुमचे उत्पन्न १० लाख रुपये असेल तर तुम्ही कर वाचवू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला जुनी कर प्रणाली निवडावी लागेल. जुन्या कर प्रणालीमध्ये तुम्हाला अनेक सवलतीचा दावा करता येईल. जर तुम्ही सवलतीचा दावा करत नसाल तर तुम्हाला जुन्या कर प्रणालीअंतर्गत २० टक्के कर भरावा लागेल. परंतु सवलतींवर दावा केल्यास तुमची कर बचत होऊ शकते.

कर कसा वाचवायचा

जुन्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनचे ५० रुपये वाचतात. त्यामुळे तुम्हाला ९.५० लाख रुपयांवर कर द्यावा लागेल.

या उत्पन्नात तुम्हाला पीपीएफ, ईपीएफ, एनसीसीवरील गुंतवणूकीवर ८० सी कलमाअंतर्गत सूट मिळते. त्यामुळे १.५ लाखांची बचत होईल. त्यामुळे ८ लाख रुपयांवर कर द्यावा लागेल.

नॅशनल पेमेंट सिस्टिममध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास 80CCD(1B)अंतर्गत ५० हजार रुपयांची सवलत मिळेल. जर तुम्ही ५० हजार रुपये गुंतवणूक केली तरच ही सवल मिळेल. आता ७.५० लाख रुपयांवर कर द्यावा लागेल.

जर तुमच्या नावावर होम लोन असेल तर त्याच्या व्याजाच्या आयकर कलम 24B अंतर्गत २ लाखांची बचत होईल. त्यामुळे आता तुम्हाला फक्त ५.५० लाखांवर कर भरावा लागेल.

आयकर अधिनियम कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्यावर २५ हजार रुपयांपर्यंत बचत करु शकतात.या आरोग्य विम्यात पती, पत्नी आणि मुलाचे नाव असणे गरजेचे आहे. आईवडिलांच्या विमा खरेदीवर तुम्हाला ५० हजारापर्यंत सवलत मिळेल. त्यामुळे तुमच्या ७५ हजार रुपयांची बचत होईल.

त्यामुळे आता तुम्हाला फक्त ४.७५ लाखावर कर द्यावा लागणार आहे. जुन्या कर प्रणालीत ५ लाखांवर कर नसल्याने तुम्हाला कोणताही प्रकारचा कर भरावा लागणार नाही.

नव्या कर प्रणालीत बदल

नव्या कर प्रणालीत टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला आहे. यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन ७५ हजार रुपये आहे. त्यामुळे ९ लाख २५ हजार रुपयांवर कर भरावा लागणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला ५२,५०० रुपयांऐवजी ४२,५०० रुपये कर भरावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yashomati Thakur : मला ब्लॅक करतोय, २५ लाखांची मागणी; यशोमती ठाकूरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर खळबळजनक आरोप

Delhi Politics : दिल्लीत 'आप'ला मोठा झटका; बड्या नेत्याने मंत्रिपद सोडलं, पक्षाचा राजीनामाही दिला

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का

Health Tip: मनूका कोणत्या व्यक्तींनी खावू नये ?

VIDEO : हेमंत पाटील-प्रताप पाटील चिखलीकर मनोमिलनाचा महायुतीला फायदा?

SCROLL FOR NEXT