Budget 2024 By announcement by Nirmala Sitaraman Saam TV
Union Budget 2025 Highlights

Old VS New Tax Regime: तुमचं उत्पन्न किती, किती टॅक्स वाचणार? नव्या करप्रणालीचं गणित समजून सांगणारा VIDEO बघा!

Budget 2024 Old VS New Tax Regime Comparison: मोदी सरकारने आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. या नवीन कर प्रणालीनुसार तुमच्या टॅक्समध्ये बचत होणार आहे.

Siddhi Hande

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केले आहे. या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणातील अनेक बदल केले आहेत. त्यामुळे नवीन कर प्रणाली स्वीकारलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन कर प्रणालीनुसार, जर तुमचे उत्पन्न ३ लाख रुपये असेल तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार आहे. ३ ते ७ लाख रुपये उत्पन्न असल्यास तुम्हाला ५ टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. तर ७ ते १० लाख रुपये उत्पन्न असल्यास १० टक्के कर भरावा लागणार आहे.१० ते १२ लाख उत्पन्न असल्यास १५ टक्के टॅक्स भरावा लागणार. १२ ते १५ लाख रुपये उत्पन्न असल्यास २० टक्के कर भरावा लागणार आहे. १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास ३० टक्के कर भरावा लागणार आहे.

नवीन कर प्रणालीनुसार किती बचत होणार?

जुन्या कर प्रणालीनुसार ८ लाख रुपये उत्पन्न असल्यास ३० हजार रुपये कर भरावा लागायचा तर तो कर आता २२५०० रुपये भरावा लागणार आहे. म्हणजेच तुमची ७५०० रुपये बचत होणार आहे. ज्या लोकांचे उत्पन्न १०.५० लाख रुपये होते त्यांना आधी ६०,००० रुपये कर भरावा लागत असे तोच कर आता ४७,५०० रुपये भरावा लागणार आहे. याचाच अर्थ तुमचे १२,५०० रुपये वाचणार आहेत. १५.५० लाख रुपये उत्पन्न असल्यास १.५० लाख रुपये कर द्यावा लागत असेल परंतु तोच कर आता १.३५ लाख रुपये द्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमची १५००० रुपये बचत होणार आहे. २०.५० लाख रुपये उत्पन्न असलेल्या लोकांना ३ लाख रुपये कर भरावा लागत असे. हा कर आता २.८२ लाख रुपये भरावा लागणार आहे. म्हणजेच तुमच्या करात १७५०० रुपयांची बचत होणार आहे. ५०.५० लाख रुपये उत्पन्न असल्यास तुम्हाला १२ लाख कर भरावा लागत असेल हाच कर आता ११.८२ लाख भरावा लागणार आहे. याचाच अर्थ असा की तुमचे १७,५०० रुपये वाचणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT