maharashtra live news 1 august 2023 PM Narendra Modi Pune Visit Samruddhi Mahamarg Accident Maharashtra Politics latest updates in marathi Saam TV
ब्लॉग

Live Blog : ७० हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Maharashtra Live News in Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना, दिवसभरातील बातम्यांचे लाईव्ह अपडेट इथे वाचा...

साम टिव्ही ब्युरो

भिवंडी शहरातील अग्नी तांडवांच्या घटना सुरूच

भिवंडी शहरातील अग्नी तांडवांच्या घटना सुरूच असून मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास धामणकर नाका अजंठा कंपाउंड या परिसरातील महाकाल डाईंग या कच्च्या कपड्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.

७० हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

७० हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेगवेगळे राजकीय आरोप होत असतात. महाराष्ट्र बँक संदर्भात पण चौकशी झाली. काय झालं? चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे चौकशी होत असते. आरोप होत असतात, असे अजित पवार म्हणाले.

संभाजी भिडेंवर पोलीस योग्य ती कारवाई करतील - अजित पवार

बेताल वक्तव्यांप्रकरणी संभाजी भिडेंवर पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावरील दुर्घटना दुर्दैवी - अजित पवार

समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील सरलांबेनजीक पुलाचे काम सुरू असताना अपघात झाला. यात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. 

ठाणे जिल्ह्यासाठी सर्वात मोठी बातमी, बारवी धरण भरले

आज बारावी धरण पूर्ण भरले.

बारवी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

दुपारी ३ वाजता ७२.६० मीमी पाणीपातळी गाठली.

७२.६० मीमी. पाणीपातळी गाठल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले

समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८ वर  

नवी दिल्ली - लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित

केव्हाही निवडणुका लागू शकतात, तयार असायला हवं: उद्धव ठाकरे

कल्याण-डोंबिवलीची जागा आपल्याला जिंकायचीच आहे.

उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर बोलून दाखवला निर्धार

विधानसभा संपर्कप्रमुख यांनी कामाला लागावं.

बूथ प्रमुख आहेत त्यांना सक्रिय करा, त्यांच्याकडून कामं करून घ्या

मतदारसंघात फिरत राहा, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

मतदारयादीत ज्यांची नावे वगळली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून अडचणी जाणून घ्या.

ज्यांच्या कागदपत्रांची अडचण आहे, त्यांच्याशी संपर्क करून अडचणी सोडवा.

केव्हाही निवडणुका लागू शकतात आपण तयार असायला हवे, उद्धव ठाकरेंचे प्रतिपादन

दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर

दिल्लीतील अधिकाऱ्यांचा बदल्यांसंदर्भातील विधेयक लोकसभेत मांडलं

२५ जुलै रोजी अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती.

हे विधेयक संविधानाचे उल्लंघन करून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान करणार असल्याची विरोधकांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलं विधेयक

विरोधकांचा मात्र लोकसभेत गोंधळ

गेल्या वेळी आम्ही तिघे होतो, रोल वेगवेगळे होते - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अतिशय गौरवाचा दिवस आहे. पुणे मेट्रोचा एक नवीन टप्पा आज सुरू करत आहोत. मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले. पहिल्या टप्प्याचे लोकार्पणही त्यांच्याच हस्ते झाले होते. दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पणही मोदी करत आहेत. मागच्या वेळेला शिंदे, अजितदादा होते आणि मीही होतो. मात्र, तिघांच्या भूमिका वेगवेगळ्या होत्या.

महाराष्ट्रातलं उत्तम शहर पुणे आहेच, मोदींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम करून दाखवू.

देशाच्या विकासाचं नेतृत्व पंतप्रधान मोदी करतात- अजित पवार

PM मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन 

सशक्त आणि समृद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करू - PM मोदी

महाराष्ट्र भूमीला कोटी कोटी वंदन करतो, पंतप्रधान मोदींनी मराठीतून केली भाषणाची सुरुवात

PM नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

देशातला पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवरायांच्या काळात - शरद पवार

मोदींनी सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला : CM एकनाथ शिंदे

मोदींनी सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. जगभरातील नेत्यांना मोदींची भुरळ पडली आहे, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या ९ वर्षांत देशात केलेल्या कामांना लोकमान्यता मिळाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

पुणे: लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, PM मोदींचे व्यासपीठावर आगमन

PM Narendra Modi Pune Visit Live Updates: PM मोदींच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अभिषेक अभिषेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दाखल झाले आहेत. येथे पोहचल्यावर मंदिरात मोदींच्या हस्ते पुजेला सुरुवात झालीये.

PM मोदी दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात दाखल; बाप्पाच्या जयघोषात नागरिकांची तुफान गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पुण्यात दाखल झालेत. तसेच आता ते दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात पोहचलेत. मोदींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उफाळली आहे. नागरिकांकडून गणपती बाप्पाचा जयघोष केला जातोय.

PM मोदी पुणे विमानतळावर दाखल; स्वागतासाठी तुफान गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. नुकतेच मोदी पुणे विमानतळावर दाखल झालेत. त्यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीये.

PM मोदींच्या सुरक्षिततेसाठी ५ हजारांहून अधिक पोलीस तैनात 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे शहरात पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात आहेत. आज सकाळपासूनच पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काही प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दल तसेच सीआयएसएफचे जवान देखील सुरक्षिततेसाठी तैनात आहेत.

पुण्यात मोदींविरोधात आंदोलन सुरू; पोलिसांकडून धरपकड 

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला इंडिया फ्रंट पुणेकडून विरोध केला जात आहे. मोदींविरोधातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या एकत्र पत्रकार परिषदेत ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पक्ष) काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा देण्यात आला होता. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली आहे. एकूण २६ पक्ष आणि संघटना या आंदोलनात सहभागी झालेत. पोलिसांचा मोठा फौजफाठा आंदोलन स्थळी हजर असून आंदोलकांची धरपकड करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वाजता त्यांचे पुणे विमानतळावर आगमन होईल. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ते स्वीकारणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे, पंतप्रधान आवास योजनांच्या सुमारे चार हजार घरांचे लोकार्पण होणार आहे.

तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) बांधण्यात येणाऱ्या सहा हजार घरांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, मोदींच्या स्वागतासाठी पुणे शहर सजलं आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर, वाहतूकीत मोठा बदल

PM Modi Pune Visit 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत आहेत. सकाळी १० वाजता त्यांच पुणे विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर ११ वाजता ते दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी ११.४५ वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी १२:४५ पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यामुळे वाहतूकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र काही थांबत नाहीये. सोमवारी रात्रीच्या सुमारास शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू असताना ग्रेडर-मशिन पुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Constable Death Case: पत्नीनं पोलीस नवऱ्याचा घेतला जीव? पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं पालघरमध्ये खळबळ

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कृषी योजनांचा लाभ मिळवायचाय? ई-केवायसी अन् फार्मर आयडी आहे गरजेचं

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT