'आईने पाय धरले, भावाने डोकं तोडलं' औरंगाबादमधील खुनाचे समाजमनावर परिणाम! Saam TV
ब्लॉग

'आईने पाय धरले, भावाने डोकं तोडलं' औरंगाबादमधील खुनाचे समाजमनावर परिणाम!

याप्रकरणी रविवारी औरंगाबादच्या वीरगाव पोलिसांत मुलासह आईवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावाने आईच्या मदतीने बहिणीच्या गळ्यावर कोयत्याचे सपासप वार करून शिर धडावेगळे केल्याची घटना औरंगाबादमध्ये चार दिवसांपूर्वी घडली. जीवाचा थरकाप उडविणाऱ्या घटनेनं धक्का बसला. अशा घटनेनं राज्याची मान शरमेने तर खाली गेली आहे. शिवाय अशा घटना थांबणार तरी कधी असा सवाल विचारला जाऊ लागला. सोशल मीडियात हाच प्रश्न विचारला जात असल्यानं औरंगाबादच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता सगळ्यांनी विचार करायला हवं.

घटना ही औरंगाबाद जिल्ह्यातली. मात्र, त्याचे समाजमनावर खोल परिणाम झाले आहेत. बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग आई आणि भावाच्या मनात इतका दाटला होता की, हत्येनंतर बहिणीचे धडापासून वेगळे केलेले शिर हातात धरून ते घराबाहेर आणून 'बघा तिला आम्ही मारले' असे म्हणत ते तेथेच टाकून दिले. त्यानंतर दोघे मायलेक दुचाकीवरून वैजापूर पोलिसांत स्वतःहून हजर झाले. याप्रकरणी रविवारी औरंगाबादच्या वीरगाव पोलिसांत मुलासह आईवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारातील १९ वर्षीय किशोरी ऊर्फ कीर्ती अविनाश थोरे असे हत्या झालेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. शोभा संजय मोटे असे आईचे तर खून करणाऱ्या भावाचे वय १८ पेक्षा कमी आहे, त्यामुळे नाव सांगता येत नाही. किशोरी आणि अविनाश थोरे यांचा प्रेमविवाह केल्यावर झाल्या नंतर ते दोघेही अविनाशच्या घरी सुखाने नांदत होते. गेल्या आठवड्यात किशोरीची आई शोभा या तिला भेटण्यासाठी सासरी येऊन गेल्या होत्या. त्यानंतर रविवारी दुपारी त्या आपल्या मुलासोबत अविनाशच्या घरी आल्या होत्या. अविनाश आजारी असल्याने घरात झोपलेला होता, तर त्याचे आई-वडील व अन्य कुटुंबीय घरासमोरील शेतात कांद्याची लागवड करत होते. आई व भाऊ भेटायला आल्याने किशोरी शेतातील काम बाजूला ठेवून घरात आली. त्या दोघांना चहा करण्यासाठी ती किचनमध्ये गेलेली असता आई व भाऊही तिच्यामागे आले. आई शोभा यांनी किशोरीचे पाय धरले तर भावाने सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर सपासप चार वार करून शिर धडावेगळे केले.

बहिणीचे शिर आणून टाकले ओट्यावर किशोरीचा ओरडण्याचा आवाज ऐकून अविनाश जागा झाला. मात्र या मायलेकांचा रुद्रावतार पाहून तो घरातून बाहेर पळून गेला. मृत किशोरीचे शिर हातात घेऊन तिचा भाऊ बाहेर ओट्यावर आला व समोर शेतात काम करणाऱ्यांना 'बघा तिला मारून टाकले' असे म्हणू लागला. त्यावेळी घराच्या पायऱ्यावर बसलेली अविनाशची आजी नातसुनेचे शीर पाहून तेथेच स्तब्ध बसून राहिली. त्याचा आवाज ऐकून अविनाशचे आई-वडील व कुटुंबीय या ठिकाणी जमा झाले. तोपर्यंत हे दोघे मायलेक तेथून पसार होऊन मोटारसायकलने वैजापूर पोलिसांत हजर झाले. सैराटच्या कथानकासारखी घटना समोर आल्यानंतर समाजात त्याची खोलवर परिणाम होऊ लागले आहेत. आता अशा घटना थांबवण्यासाठी काय करावे यावर चर्चा होऊ लागल्यात. कारण निष्पापांचे बळी आता थांबले पाहिजेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT