ऑलम्पिकच्या मैदानावर अवतरल्या गौराई Saam Tv
ब्लॉग

ऑलम्पिकच्या मैदानावर अवतरल्या गौराई

ऑलम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना अकलूजच्या देशमुख कुटुंबियांकडून मानवंदना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनुजा राजकुमार देशमुख

सोलापूर - यंदाही गौरी गणपतीच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. परंतू यातून बाहेर पडून जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी तसेच पुन्हा प्रगतीच्या मार्गावर चालण्याकरिता क्रीडा संस्कृती महत्त्वाची असून ती सर्वांनी जोपासावी यासाठी अकलूजच्या देशमुख कुटुंबीयांनी यंदा ऑलम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान हा गौरी आरास मधून साकारला आहे. ऑलम्पिक स्पर्धेने दाखवून दिले की स्वयंशिस्त आणि समर्पणाने आपण जगजेत्ते बनू शकतो.

ऑलम्पिकच्या इतिहासात प्रथमच भारताने सुवर्णपदकासह सर्वाधिक सात पदकांची तर पॅराऑलम्पिक मध्ये एकोणीस पदकांची कमाई केली आहे. या सर्व पदकविजेत्या खेळाडूंना मानवंदना गौराई समोरच्या सजावटीतून देण्यात आली आहे. दागिण्यासोबतच पदक धारण करून गौराई ऑलम्पिकच्या मैदानावर अवतरल्या आहेत.

हे देखील पहा -

या देखाव्यात ॲथलेटिक्समधील पहिले आणि देशासाठी वैयक्तिक केवळ दुसरेच पदक जिंकून देणारा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हातामध्ये भाला घेऊन फेकी साठी सज्ज उभारल्याचा दाखवला आहे. पुढे वेटलिफ्टिंग मध्ये भारताला रौप्यपदक जिंकून देणारी पहिली खेळाडू मीराबाई चानू हीने विजयी भारोत्तलन केल्याचे दिसते. तसेच दोन ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला पी. व्ही. सिंधुही बॅडमिंटनच्या कोर्टवर आपली हुकमत असल्याचे जणू तिच्या देहबोलीतून सांगत आहे.

बॉक्सिंग मध्ये पहिल्याच ऑलम्पिक मध्ये कांस्यपदक जिंकणारी लव्हलिना बोर्गोहेन विजयी जल्लोष करताना साकारली आहे. त्यानंतर रौप्य जिंकणारा रविकुमार आणि कांस्यविजेता बजरंग पुनिया कुस्तीच्या आखाड्यात दिसतात. ज्या खेळामुळे आपल्याला सुवर्णयुग पहायला मिळाले अशी १९८० नंतर पहिल्यांदाच पदक जिंकणारी हॉकी टीम सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेते.

एकाच ऑलम्पिकमध्ये तिन्ही रंगांची पदके आपण पहिल्यांदाच जिंकली आणि तिरंग्याची शान व दिमाख अधिकच वाढला. अशीच आपली वाटचाल सुरु राहावी यासाठी जिंकणाऱ्या खेळाडूंचे कौतुक होते ते योग्यच असते पण केवळ स्पर्धा जिंकणेही महत्वाचे नाही तर स्पर्धेत असणेही महत्वाचे आहे, असेही म्हटले जाते. त्याच न्यायाने निसटत्या फरकाने पराभूत झालेल्या आणि थोडक्यात पदक हुकलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून गाडी भेट देणाऱ्या टाटा मोटर्सचाही खेळाडू सन्मानाचा प्रसंग विशेष लक्ष वेधून घेतो. आता भारतीय महिला ही केवळ चूल व मूल यामध्ये रमलेली अबला नसून ती जागतिक क्रीडा क्षेत्रातही आपल्या देशाची प्रतिमा उंचावत असते. पुरुषांच्या बरोबरीने पदके जिंकणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंनी यंदाच्या ऑलम्पिक मधून हे सिद्ध केले आहे हा सामाजिक संदेशही अनुजा देशमुख यांनी या निमीत्ताने दिला आहे.

ऑलम्पिक विजेते खेळाडू हे देशाचे वैभव आहेत आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची एक संधी म्हणून यंदा गौराई समोर पदक विजेत्या खेळाडूंचा देखावा साकारण्यात आला आहे. तसेच क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा सुद्धा यामागचा उद्देश आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HAL Recruitment: हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ६०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

New Family Pension Rule: आई- बाबांची पेन्शन मुलांना मिळते का? लग्न झालेल्या मुलीचा अधिकार किती?

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT