अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने शिवकालीन किल्ले दुर्गाडीला 5 हजार दिव्यांची आरास करण्यात आली. शेकडो नागरिकांनी या दीप महोत्सवात सहभाग घेतला होता.
या दिव्यांच्या रोषणाईने किल्ले दुर्गाडी उजळून निघाला होता. यावेळी किल्ले दुर्गाडीवर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील ,आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली. किल्ल्यावर जय शिवाजी जय भवानी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आला.
नाशिकच्या काळाराम मंदिराला ठाकरे कुटुंबीयांनी भेट दिली. यावेळी काळाराम मंदिर विश्वस्त मंडळाने उद्धव ठाकरे यांचं स्वागत आणि सत्कार केला. महाराष्ट्राला चांगलं सरकार मिळू दे, असं साकडं उद्धव ठाकरे यांनी काळारामाला घातलं. तसेच त्यांनी संकल्प पूजा देखील केली.
नवापूर शहरातील भगतवाडी परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनला आग लागल्याची घटना घडली. एटीएममधून धूर निघत असल्याने परिसरातील नागरिकांना लक्षात येतात. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करण्यात आला. यानंतर परिसरातील वीज पुरवठा खंडित केला गेला.
वीजपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून एटीएम परिसरात नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी झाली होती. या एटीएम परिसरात नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.
शिंदे गटाच्या आमदारांना दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिला होता. यावर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली आहे.
अयोध्यातील ऐतिहासिक राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा जल्लोष देशभरात पाहायला मिळत आहे.जे राम भक्त आज घरी किंवा अयोध्येत नाहीत तर जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. त्यांनी बर्फात प्रचंड थंडीतही हा आनंद व्यक्त केला आहे.
मुंबईच्या भांडुप आणि मुलुंडमधील मनसे कार्यकर्ते यांनी थेट जम्मू-काश्मीर येथील समथम टॉप येथे, बर्फाळ डोंगरात श्री रामाचा झेंडा फडकवत जय श्रीरामचे नारे लगावून एकच आनंद उत्सव साजरा केला. तसेच यावेळी भारत देशाचा आणि मनसेचा झेंडाही फडकवला गेला.
छत्रपती संभाजी नगरात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी औरंगपुरा येथे काढण्यात आलेल्या शोभा यात्रेदरम्यान रामलल्लाच्या गाण्यावर नाचत आपला आनंद साजरा केला आहे. यावेळी त्यांनी हातात भगवा ध्वज फिरवत, प्रभू श्री राम तसेच रामायणातील पात्रांची वेशभूषा धारण केलेल्या लहान लहान मुलांना लाडू भरवत राम मंदिर सोहळ्याचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा केलाय. सकाळपासूनच छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण शहरात भक्तिपूर्ण राममय वातावरण निर्माण झालंय.
कोल्हापूरचा मायक्रो आर्टिस्ट अशी आपली नवीन ओळख निर्माण करणारा अशांत मोरे याने जगातील सर्वात लहान प्रभू रामचंद्रांच्या लाकडी पादुका, रुद्राक्षावर श्रीरामांची प्रतिमा आणि धनुष्यबाण याची प्रतिकृती तयार केली आहे. लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून अशांत भिमराव मोरे याने प्रभू रामचरणी सेवा अर्पण करत जगातील सर्वात लहान प्रभू रामचंद्रांच्या लाकडी पादुका, रुद्राक्षावर श्रीरामांची प्रतिमा आणि जगातील अत्यंत छोटे श्री रामचंद्रांचे धनुष्यबाण याची प्रतिकृती तयार केलेली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भगुरमधील स्मारकात पोहोचले. १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी ते सावरकर स्मारकात आले नव्हते. मात्र, आता उद्धव ठाकरे यांच्याकडून सावरकरांना अभिवादन करण्यात येणार आहे. मोदींना सावरकरांचा विसर पडला, असा भासवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येच्या राज्याचं पहिलं रुप समोर आलं असून दर्शनाने भाविक भारावून गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले असून प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झाली आहे. अयोध्येतील पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य सोहळ्याला काही मिनिटांचाच अवधी शिल्लक आहे. तब्बल ५०० वर्षांनंतर राम आपल्या घरी पुन्हा परतणार असल्याने रामभक्तांमध्ये वेगळंच वातावरण आहे. राजकीय नेते, कलाकार, साधू-संत, कारसेवक यांच्यासह भाविकही अयोध्येत दाखल होत आहे.
दरम्यान सोमवारी पहाटेच्या शरयू नदीच्या तीरावर तसेच मंदिर परिसरात रामभक्तांची गर्दी पाहायला मिळाली. सकाळीच शरयू नदीवर साधूसंत यांच्यांसह रामभक्तांनी गर्दी करत अभ्यंग स्नान केले. राममंदिराचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. दुपारी १२ वाजेपासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे अयोध्येत दाखल झाले आहेत. मोदी अयोध्येत दाखल होताच जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
नाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. आजच्या विशेष पर्वावर प्रत्येकाला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे क्षण याची देही याची डोळा पाहण्याची इच्छा आहे. मात्र ते शक्य नसल्यानं नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेवून भाविक श्री रामनामाचा जागर करतायत. त्यामुळे काळाराम मंदिर जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील श्रध्दा नवनाथ ससाणे या मुलीने आपल्या घरी ८ कडधान्याचा माध्यमातून प्रभु श्रीरामांची सुरेख अशी रांगोळी रेखाटली आहे. १० बाय १२ अशा साईजमध्ये ही रांगोळी रेखाटण्यात आली आहे. तर यासाठी ६ किलो कडधान्याचा वापर करण्यात आला आहे.
प्रभू श्रीरामांची रांगोळी तयार करण्यासाठी श्रद्धा ससाणेला २ दिवसांचा कालावधी लागला आहे. प्रभू रामचंद्र यांचा डोक्यावरील मुकूट तसेच धनुष्यबाणाची हुबेहुब रेखाटणी करण्यात आली आहे. ही कलाकारी पाहून परिसरातील नागरिक कौतुक करीत आहेत. रांगोळी काढण्यासाठी श्रध्दा ससाणे हिला तीच्या भावाने मदत केली आहे.
अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघ्या काही तासांचाच अवधी बाकी आहे. यानिमित्ताने देशभरातील विविध मान्यवर या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचं कळतंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या अयोध्येत कडाक्याची थंडी आहे. त्याचबरोबर खराब हवामानही असल्याने अडवाणी यांनी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतलाय. सध्या अडवाणी हे ९६ वर्षांचे असून ते राम मंदिर आंदोलनात ते प्रमुख भूमिकेत होते.
अयोध्या येथील नवनिर्मित मंदिरामध्ये आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने रामभक्तांमध्ये उत्साह संचारला असून या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रामभक्त आतुर झाले आहेत. नाशिकमधील खामगाव येथील वंदे मातरम मंडळाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.
खामगाव येथीलगांधी चौकाचा परिसर भगवे ध्वज आणि पताका लावून सुशोभित करण्यात आला आहे. तर रामभक्तांना शुभेच्छा देणारे फलक झळकत आहेत. मोतीचूरच्या लाडूने 'राम' व वंदेमातरम अशी अक्षरे अंकित करण्यात आली आहेत. तसेच भव्य राम दरबार सजविन्यात आला असून भव्य हनुमान मुर्ती आकर्षण ठरत आहे. परिसरातील राममय वातावरण डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.
अयोध्येत आज प्रभु श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. प्राणप्रतिष्ठा पूजा ५ तास चालणार आहे. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ८४ सेंकदाचा मुहूर्त असणार आहे.
सकाळी १० वाजून ३० मिनिटापर्यंत प्रमुख अतिथींना आपल्या जागेवर बसावे लागणार.
दुपारी १२ वाजून २० मिनिटे ते १ वाजेपर्यंत मुख्य प्राणप्रतिष्ठा महापूजा आणि महाआरती होणार.
दुपारी १ ते २ वाजून १५ मिनिटांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत व महंत नृत्यगोपाल दास उपस्थितांना संबोधित करतील.
२ वाजून ३० मिनिटापासून ८ हजार आमंत्रित पाहुण्यांना प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेता येणार.
५० देशांमधून आलेले प्रतिनिधी रामलल्लाचे दर्शन घेणार, ५०० कंपनी प्रतिनिधी, इंजिनिअर, कामगार आणि निर्माण कार्यात असणारे लोक दर्शन घेणार.
दिवसभर राममंदिरात भक्तीमय वातावरण असणार तसेच विविध पूजा तसेच विधी पार पाडले जाणार.
अयोध्येत आज प्रभु श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभरात भक्तीमय वातावरण आहे. मंदिरात प्राणप्रतिष्ठा पूजा ५ तास चालणार आहे. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ८४ सेंकदाचा मुहूर्त असणार आहे. दुपारी १२:२९ ते १२:३० दरम्यान प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलल्लाची स्थापना झाल्यावर महापूजा आणि महाआरती होणार आहे.समारंभास असणार आहे.
संपूर्ण देशासाठी आजचा दिवस खूपच खास आहे. कारण, आज २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे.
दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करीत आहेत. त्यांच्या पायी यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. यासह देशविदेश तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स मिळवण्यासाठी साम टीव्हीचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा....
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.