बातम्या

पुणे शहरात पाणीपुरवठ्यात खोळंबा

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.

बहुतांश भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने पाणी नेमके कुठे जातेय, हाच प्रश्‍न विचारला जात आहे. सर्वत्र पाणी सोडले जात आहे. मात्र, काही भागांत कमी पाणी मिळत असावे, असा खुलासा महापालिकेचे पाणीपुरवठा खाते करीत आहे. पण, ते का मिळत नाही आणि लोकांना न मिळणारे पाणी कुठे जाते, याचे उत्तर मात्र या अधिकाऱ्यांकडे नाही.

पेठांत मध्यरात्री पाणी
कसबा पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेच्या काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. या भागांत एक-दीड तास पाणी येत असले, तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने अपुरे पाणी मिळत आहे. त्याशिवाय, वेळापत्रकही बदलले असून, काही ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येते.

प्रभात रस्ता भागात नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात नाही. त्याबाबत चार वेळा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणी देण्यात आले. पण, मूळ पाणीपुरवठा होत नाही. गेली सहा महिने हीच स्थिती आहे. 
- महेश सोवनी, रहिवासी, प्रभात रस्ता 

तक्रारी जाणून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे काही भागांना कमी पाणी मिळत असेल. पण, सर्व भागांत पुरवठा सुरू आहे. जेथे कमी आणि उशिरा पाणी येते, त्या भागांत टॅंकरही पुरवीत आहोत.
- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका

Web Title: Water supply disrupted in Pune city
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICSE Bord Result: आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

Today's Marathi News Live : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकरांचा नवा जाहीरनामा

D.K. Shivkumar: कार्यकर्त्याने खांद्यावर हात ठेवला.. उपमुख्यमंत्र्यांनी थेट कानाखाली लगावली; काँग्रेस नेत्याचा VIDEO व्हायरल

Today's Gold Silver Rate : लग्नासाठी दागिने बनवायचेत? मग आजचा सोने-चांदीचा भाव जाणून घ्या

Akola News : शिक्षकाचा शॉक लागून मृत्‍यू; शेतात भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना घडली घटना

SCROLL FOR NEXT