GANAPATI TEMPLE
GANAPATI TEMPLE 
बातम्या

Saam Impact: 'त्या' 26 एकर जमिनीचा फेर रद्द करण्याचे दिले आदेश

- सिद्धेश सावंत

बीडमध्ये गणपती बाप्पालाच गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार साम टीव्हीने समोर आणला होता. नामलगाव येथील नवसाला पावणाऱ्या गणपतीची, तब्बल 26 एकर जमीन, एका रात्रीत तीन व्यक्तींनी परस्पर नावे करून घेतली. हा सर्व प्रकार साम टीव्हीने समोर आणला होता. आता या बातमीनंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे.(There are orders to cancel 26 acres of land of Ganpati Devasthan)

ज्या आदेशाने संबंधित तलाठ्याने या गणपती देवस्थानाच्या 26 एक्कर जमिनीवर फेर ओढत, ही जमीन तीन व्यक्तींच्या नावे केली आहे. तो आदेशच बोगस असल्याचं, सामान्य जिल्हा प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांनी म्हटलंय. त्यामुळं या 26 एक्कर जमिनीचा फेर ओडलेला तो फेर, तात्काळ रद्द करून, ती जमीन पुन्हा पहिल्या नावे म्हणजेच, गणपती देवस्थानाच्या नावे करावी. असे लिखित आदेश दिलेले आहेत.

हे देखील पाहा

मात्र उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले असताना देखील, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी, या प्रकरणाची सुनावणी लावली आहे. या अगोदर 7 तारखेला या प्रकरणाची सुनावणी झाली असून पुन्हा एकदा उद्या म्हणजेच 11 जून रोजी याची सुनावणी आहे. उपजिल्हाधिकारी आघाव यांनी ज्या आदेशाच्या आधारे फेर ओढला आहे. तो आदेशचं बोगस असल्याचं म्हटलंय.ओढलेला फेर तात्काळ रद्द करा. असं देखील म्हटलंय तरी देखील उपविभागीय अधिकारी टिळेकर यांनी सुनावणीचा घाट का घातलाय ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी उपस्थित केलाय.

ज्या तिघांनी बोगस आदेशाने जमीन नावे करून घेतली त्या तिघांवर अगोदर गुन्हा दाखल केला पाहिजे.मात्र त्या तिघांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सुनावणी घेतली जात आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. यामुळं जिल्हा प्रशासनात जाणीवपूर्वक, हा सावळा गोंधळ घातला जात असल्याचा आरोप देखील रामनाथ खोड यांनी केला आहे. दरम्यान याविषयी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना जामीन मंजूर

Prajakta Mali: अभिनेत्री अन् बिझनेस वूमन आहे प्राजक्ता माळी

Maharashtra Political : वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून नसीम खान नाराज; MIMने दिली खुली ऑफर, आता काय निर्णय घेणार?

Aarti Singh Wedding: गोविंदा-कृष्णा अभिषेक यांच्यातलं भांडण मिटलं? कश्मिरा पाया पडली, माफी मागितली

Mahayuti Politics News | महायुतीचं जागावाटप 24 तासात फायनल ?

SCROLL FOR NEXT