10 vi.jpg
10 vi.jpg 
बातम्या

10 वीच्या परीक्षा न घेण्याबाबत  राज्यसरकार  उच्च न्यायालयात  प्रतिज्ञापत्र  सादर करणार

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

मुंबई :  महाराष्ट्र राज्यसरकार Maharashtra Government  आज (28 मे )  10 वीच्या परीक्षा न घेण्यासंदर्भात  उच्च न्यायालयात  प्रतिज्ञापत्र  सादर करणार आहे. परीक्षासंदर्भातील निकष ठरवण्यात आले असून आज जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  तसेच  आज दुपारपर्यंत राज्य सरकार दहावी परिक्षासंदर्भातला जीआर जाहीर करण्याची शक्यता असून याबाबत  राज्याच्या शिक्षणमंत्री  वर्षा गायकवाड दुपारपर्यंत माध्यमांशी संवाद साधणार आहेत.   (The state government will file an affidavit in the high court against not taking the 10th exam) 

महाराष्ट्रातल्या परिक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी खुलासा केला आहे. कोविड 19 च्या तिसऱ्या लाटेत तज्ञांनी  लहान मुलांना संक्रमणाचा सर्वाधिक धोका सांगितला आहे.  त्यामुळे सद्यस्थिती परीक्षा घेण्यासाठी  योग्य नाही.  परंतु परीक्षा पुढे ढकलल्यास निकालास उशीर होईल आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासावर  होऊ शकतो, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.  सध्याची दहावी आणि बारावीची  परीक्षा रद्द  करुन  विद्यार्थ्यांचे गुणांकन करण्याचा मार्ग शोधला पाहिजे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करता येतील, असेही त्यांनी सांगितले आहे. 

तसेच,  दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापणाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना 50 टक्के अंतर्गत मापणाच्या आधावर आणि   50 टक्के शाळा आणि शिक्षण मंडळाच्या स्तरावर दिले जावेत, असे ठरविण्यात आहे. 

तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दहावी आणि बारावी परीक्षांसंदर्भात आम्ही चर्चा केली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेतील वाढता संसर्ग पाहता तिसऱ्या लाटेत मुलांना धोका जास्त आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य  धोका आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य या दृष्टीने आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या सर्व परिस्थितीबाबत प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून राज्यसरकार मुंबई उच्च न्यायालयाकडे राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती मांडेल, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

Edited By - Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar News: रोहित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का! कट्टर समर्थकाने सोडली साथ; अजित पवार गटात प्रवेश

Gold Prices Decline : सोन्याचे दर गडगडले; दागिन्यांसाठी दुकानात नागरीकांची गर्दी, वाचा महाराष्ट्रातील आजचा भाव

Dadar Railway Station: थोडक्यात अनर्थ टळला! अमरावती एक्स्प्रेस दादर स्थानकात आल्यानंतर नेमकं काय घडलं?

Sobhita Dhulipala : अभिनेत्री शोभिता धुलिपाला पडली प्रेमात? नागा चैतन्यसोबतच्या डेटिंगबद्दल केला मोठा खुलासा

Malshejh Ghat Accident News: माळशेज घाटात भीषण अपघात! दूध टँकर आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT