बातम्या

शाहरुखचा 'झिरो' झळकला; पण कुणालाच नाही आवडला!

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' आज देशभरात झळकला. पण कट्टर शाहरुखप्रेमी वगळता अन्य चित्रपट समीक्षक आणि रसिकांना हा चित्रपट फारसा भावलेला नाही, असेच सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून दिसत आहे.  आनंद एल. राय दिग्दर्शित 'झिरो'कडून शाहरुखला मोठ्या आशा होत्या. या चित्रपटात शाहरुखने बुटक्‍या माणसाची भूमिका केली आहे. शाहरुखशिवाय या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफच्या प्रमुख भूमिका आहेत. 

आनंद एल. राय यांच्याबरोबर शाहरुखने प्रथमच काम केले असल्याने या चित्रपटाविषयी उत्सुकता होती. शाहरुखचे यापूर्वीचे काही चित्रपट सलग फ्लॉप झाल्यामुळे त्यालाही एका 'सुपरहिट'ची नितांत गरज होती. पण चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी बहुतांशी नकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे.

Web Title: Shah Rukh Khan s Zero fails to impress audience

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT