wuhan lab
wuhan lab 
बातम्या

कोरोना विषाणूची निर्मिती वुहानच्या लॅबमध्येच!; वैज्ञानिकांना मिळाला पुरावा

अक्षय कस्पटे

कोरोना विषाणूची (Coronavirus) उत्पत्ती शोधण्यासाठी पुन्हा तपासणी करण्याची मागणी वाढत असताना एका नवीन अभ्यासानुसार खळबळजनक दावा करण्यात आला आहे. असे म्हटले आहे की हा विषाणू वूहानच्या प्रयोगशाळेत (Wuhan Laboratory) चिनी वैज्ञानिकांनी तयार केला होता. त्यानंतर उलट-अभियांत्रिकी आवृत्तीतून हा विषाणू लपविण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच कोरोना विषाणू नैसर्गिकरित्या वाटवाघूळामधून विकसित झाला असे सूचित होते. (Scientists found evidence of corona virus formation in Wuhan's laboratory)

कोरोना विषाणू नैसर्गिकरित्या तयार झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत 
ब्रिटनचे प्राध्यापक अँगस डॅलॅगिश आणि नॉर्वेजियन वैज्ञानिक डॉ. बिर्गर सोरेन्सेन यांच्या नव्या अभ्यासामुळे चीनबद्दलचा संशय आणखीनच गंभीर झाला आहे.  शास्त्रज्ञांच्या अभ्यासाने आणि डेली मेलच्या हवाल्याने असे म्हटले आहे की नोव्हेल कोरोना विषाणू सार्स-कोव्ह -2 विषाणू नैसर्गिकरित्या तयार झाल्याचे कोणतेही पुरावे नव्हते. वूहानच्या प्रयोगशाळेतील 'गेन ऑफ फंक्शन' प्रोजेक्टवर काम करणाऱ्या चिनी वैज्ञानिकांनी हा विषाणू तयार केला आहे. हा प्रकल्प नैसर्गिक विषाणूमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि त्यांना आणखी संक्रामक बनविण्याविषयी आहे, ज्याला अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी बेकायदेशीर घोषित केले होते.

गुहेत राहणाऱ्या वटवाघुळातून नैसर्गिक कोरोना विषाणू काढला
या संशोधन अभ्यासात  दावा केला आहे की चिनी शास्त्रज्ञांनी तेथील गुहेत राहणाऱ्या वटवाघुळातून नैसर्गिक कोरोना विषाणू काढला आणि नंतर त्याला स्पायकाला चिकटवून तो अत्यंत प्राणघातक आणि जलदगतीने पसरणारा कोविड-१९ बनविला. कोविड-१९ च्या नमुन्यात संशोधकांना 'अनोखा फिंगरप्रिंट' सापडला आहे, असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे. त्याचबरोबर, असे काम फक्त प्रयोगशाळेत छेडछाड केल्यावरच संभव आहे असाही दावा वृत्तपत्राने केला आहे.

डॅग्लेश आणि सोरेन्सेन त्यांच्या अभ्यासात असे लिहितात की '' प्राथमिक दृष्ट्या त्यांच्याकडे एक वर्षांपूर्वीपासून रेट्रो-इंजिनेरींगचे पुरावे आहेत. परंतु, त्यांच्या या अहवालाकडे अनेक शिक्षकतज्ञ आणि मुख्य जर्नल्सनी दुर्लक्ष केले. चीनमधील एका प्रयोगशाळेत हा डेटा जाणूनबुजून नष्ट, लपविला किंवा छेडछाड करण्यात आला असा आरोप या अभ्यासामध्ये करण्यात आला आहे.

चीनने आवाज उठवणाऱ्या वैज्ञानिकांना गायब केले 
ज्या वैज्ञानिकांनी यावर आवाज उठविला, चीनी सरकारने एकतर त्यांना शांत केले किंवा ते गायब झाले. या नव्या अभ्यासानंतर विषाणू तयार करण्यात चीनच्या भूमिकेविषयी सध्या सुरू असलेली चर्चा अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. वैज्ञानिक जर्नल क्वार्टरली रिव्यू ऑफ बायोफिजिक्स डिस्कवरीमध्ये लवकरच प्रकाशित होणाऱ्या 22 पानांच्या शोधनिबंधात डॅग्लेश आणि सोरेन्सेन यांनी चीनी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणू तयार करण्यासाठी कशी साधने तयार केली यासंबंधित प्रत्येक दुवा जोडला आहे, त्यातील काही जण अमेरिका युनिव्हर्सिटी सोबत काम करत आहेत.

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT