People in Curfew veg market 960
People in Curfew veg market 960 
बातम्या

संचारबंदी लागू होताच भाजी घेण्यासाठी मार्केटमध्ये लोकांची मोठी गर्दी

श्रेयस सावंत

मुंबई - संचारबंदी लागू होताच भाजी मार्केटमध्ये लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाजी घेण्यासाठी सगळ्या गृहिणींनी आता परळ भोईवाडा मार्केटमध्ये गर्दी केली. जवळपास मुंबई आणि मुख्य शहारतील सर्वच बाजारात हे चित्र होतं. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवण्याची कोणतीही गरज नाही, असं सांगितलेलं असतनाही लोकांकडून मात्र सरकारच्या आवाहनाला हरताळ फासला जातो आहे. 

पुणे मार्केट यार्ड बंद

पुण्यातील मार्केट यार्ड २५ मार्च ते  ३१ मार्च पर्यंत बंदचा निर्णय झालाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. तर नवी मुंबईतील  एपीएमसी मार्केट 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना भाजीचा तुटवडा जाणवेल की काय, अशी शंका उपस्थित केली जाते आहे.

नवी मुंबई एपीएमसीही बंद

जनता कर्फ्यूमुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात आली होती. यामध्ये कांदा-बटाटा मर्केट, भाजीपाला मार्केट, फळ मार्केट आणि मसाला मार्केट बंद करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे येत्या 31 मार्चपर्यंत बाजार समिती बंद रहाणार आहे. त्यामुळे भाजीपाला आणि जिवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सर्वांना घरातच राहण्याची सूचना केलीय. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय वाहनांनादेखील कडक नियम लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि जीवनाश्यवक वस्तूंची दुकानं वगळता सर्व काही बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

पाहा व्हिडीओ - 

people gathered in market to buy vegitables after announcement of curfew marathi news corona virus covid 19

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT