बातम्या

राज्यात २० हजारांवर कोरोना रुग्णांची संख्या 

साम टीव्ही न्यूज

नवी दिल्ली :  20 हजारांवर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या शनिवारी पोहोचली. दिवसभरात १,१६५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा २० हजार २२८ इतका झाला आहे. दिवसभरात ३३० रुग्ण बरे झाले असून, राज्यात आतापर्यंत तब्बल ३,८०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
21 पुरुष आणि २७ महिलांसह दिवसभरात झालेल्या ४८ मृत्यूंपैकी तब्बल २७ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते. १८ जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते, तर तीन जण ४० वर्षांखालील आहेत. आज दिवसभरातील कोरोना मृतांपैकी नऊ जणांचे इतर आजार व वैद्यकीय पार्श्वभूमी अद्याप स्पष्ट झाली नाही. उर्वरित ३९ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले. 
जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ४० लाख ५० हजारांवर गेल्याने सर्वच देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत या भयावह आजाराने २ लाख ७८ हजार ८०० जणांचा बळी घेतला आहे. त्यापैकी सुमारे ७९ हजार मृत्यू एकट्या अमेरिकेतील आहेत. तर भारतातील रुग्णांची संख्या ६२ हजार ८०० वर पोहोचली आहे.

नमुन्यांपैकी २ लाख ०६ हजार ४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर २० हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. या आजारातून बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या १४ लाख १६ हजार म्हणजे एकतृतीयांशहून किंचित अधिक आहे. शिवाय २३ लाख ७७ हजार रुग्णांवर विविध देशांत उपचार सुरू आहेत. गेल्या चार दिवसांत रशियात रुग्णांची संख्या खूपच वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत तिथे २० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत रुग्णांचा आकडा आता १३ लाख २६ हजारांवर गेला आहे. ब्रिटनमध्ये ३१,६०० जण मरण पावले आहेत, तर इटलीमध्ये मृतांचा आकडा ३० हजारांवर गेला आहे. फ्रान्समध्ये २६ हजार २३० वर गेला आहे.

भारतात चार आयुर्वेदिक औषधांची चाचणी बाधित रुग्णांवर सुरू झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अत्यंत कठोर निर्देश त्यासाठी निश्चित केले असून सरसकट हा प्रयोग कुणालाही करता येणार नसल्याची ताकीद दिली आहे.आजच्या मृत्यूंपैकी सर्वाधिक २७ मुंबई, पुणे शहरातील ९, मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, तर अकोला, नांदेड व अमरावतीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. यापैकी मालेगाव शहरातील आठ मृत्यू हे २५ एप्रिल ते ८ मे २०२० या कालावधीतील आहेत.


 लॉकडाउन, फिजिकल डिस्टन्सिंग, घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुण्याची सवय लोकांनी अंगीकारली असली तरी या काळात कोरोनाने विळखा घट्ट केला आहे. तिसऱ्या लॉकडाउनचा शेवटचा आठवडा सुरू होताना देशातील रुग्णसंख्या ६० हजारांवर पोहोचली. दररोज सरासरी साडेतीन हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्य यंत्रणा सजग, सतर्क व सकारात्मक आहे. जगात थैमान घातले असले तरी भारत कोरोनास रोखेल.
मुळात पाश्चिमात्य आणि विकसित देशांसारखी स्थितीच भारतात येणार नाही, आली तरी आपण सज्ज आहोत, असा विश्वास आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला. कोरोनाविरोधात देशवासीयांचा लढा सुरू असला तरी गेल्या आठ दिवसांत रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशात १ ते ८ मेदरम्यान २४ हजार ८३२ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्ण वाढत असताना सकारात्मक बाब म्हणजे ते बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रमाण २९.९ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा लॉकडाऊनमध्ये वाढलेला कालावधी स्थिर ठेवण्यातही यश आले आहे. लॉकडाऊन सुरू होण्याआधी ३ दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत होते. ते १२ दिवसांवर आले. हे प्रमाण ९.९ वरुन आता ११ दिवसांवर स्थिरावले आहे. चालू महिन्यात सर्वाधिक ३९३२ रुग्ण ४ मे रोजी आढळले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त १२४८ रुग्ण १३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले होते.
 

WebTittle :: The number of corona patients in the state is over 20,000

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jolly LLB 3 Shooting Start : खरा जॉली कोण? अक्षय कुमार की अरशद वारसी; ‘जॉली एलएलबी ३’ च्या कथेत नवा ट्वीस्ट, शूटिंगला सुरुवात

Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Solapur Breaking: भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

Raigad News: अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT