Shiv Sena MP Arvind Sawant says I am resigning from my ministerial post.
Shiv Sena MP Arvind Sawant says I am resigning from my ministerial post. 
बातम्या

शिवसेना भाजप युती अखेर तुटली, अरविंद सावंत आज राजीनामा देणार...

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे, असे ट्विट करत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणार हे स्पष्ट झाले आहे.

पाठिंबा हवा असल्यास, भाजपशी काडीमोड घेण्याची अट काँग्रेस-राष्ट्रवादीने घातल्याने, शिवसेना NDAमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळातील एकमेव शिवसेना नेते, अरविंद सावंत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. याबाबत अरविंद सावंतांनी ट्वीट केलं असून. रितसर पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याबाबतची घोषणा करणार आहेत. NDAमधून बाहेर पडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरेंची आपल्या नेत्यांसह खलबतं सुरू होती. दरम्यान सत्तास्थापनेच्या निमंत्रणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचीही माहिती आहे.... तसंच आज उद्धव ठाकरे शरद पवारांचीदेखील भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर शरद पवार सत्तास्थापनेबाबत आणि शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत, नवी दिल्लीमध्ये जाऊन सोनिया गांधींची देखील भेट घेणार असल्याची माहिती आहे.

पाहा सिस्तर व्हिडीओ

अरविंद सावंत यांनी आज सकाळी ट्विट करत आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की या संदर्भात आज सकाळी अकरा वाजता दिल्ली येथे मी पत्रकार परिषदघेणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी जागावाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे. सत्तेत मुख्यमंत्रिपदाचे मानाचे पान मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेसमोरची राजकीय आव्हाने वाढली आहेत. भाजपने शिवसेना सोबत नसेल, तर सत्तास्थापन करण्यास असमर्थता व्यक्त करीत धक्कातंत्रांचा वापर करीत शिवसेनेला सत्ता स्थापण्यासाठी ‘खो’ दिला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १०५ जागा निवडून आल्याने शिवसेनेने ५६ जागांच्या बळावर भाजपकडे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद मागितले. पण, त्यासाठी भाजप तयार तर झाला नाहीच; पण शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्नही भाजपने केला नाही. भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करेल आणि त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेशिवाय पर्याय नसेल, असा शिवसेनेचा कयास होता. मात्र, तो पूर्णपणे फोल ठरला. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून भाजपवर दबाव वाढविण्याचाही प्रयत्न शिवसेनेकडून होत होता. मात्र, शिवसेनेची ही सगळीच गणिते फिस्कटल्याने शिवसेनेची आव्हाने वाढली आहेत.

Web Title: Shiv Sena MP Arvind Sawant says I am resigning from my ministerial post.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला अर्ज?

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

SCROLL FOR NEXT