बातम्या

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दहावीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत घेण्यात येईल; तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 या कालावधीत होईल. हे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना; तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल, असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे केवळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

Web Title: SSC-HSC examination final timetable announced
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: जुन्नर हादरलं! अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; दीड महिन्यातील तिसरी घटना

Sam Pitroda Statement : दक्षिण भारतीय आफ्रिकन लोकांसारखे दिसतात; सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याने खळबळ

Cheese Chocolate Gola: चीझ चॉकलेट बर्फाचा गोळा बघून नेटकऱ्यांचं डोकं सटकलं; VIDEO VIRAL

Healthy Chutney : महिलांच्या विविध आजारांसाठी गुणकारी चटणी; एकदा खाऊन तर पाहा

Agni Film : "अग्नी" चित्रपटात मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीही साकारणार प्रमुख भूमिका

SCROLL FOR NEXT