बातम्या

‘तुला पाहते रे’ही मालिका बंद करण्याची मागणी 

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे: एका खासगी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका महाराष्ट्रासाठी घातक असून, ही माहिती बंद करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून केली आहे.

‘तुला पाहते रे’  या मालिकेत 20 वर्षांची मुलगी 40 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचे दाखवले आहे. मात्र हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत आम्ही संबंधित वाहिनीकडे फोनवरुन तक्रार दिली, मात्र ई- मेल करण्यास बजावून आम्हाला धुडकावून लावले. या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचवला जात आहे. या मालिकेतील दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील 20 वर्षीय मुलीचे लग्न 40 वर्षीय युवकाशी लावून देतील का? त्यामुळे या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी, असे प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.

विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांची प्रेम कहाणी या मालिकेत दाखविण्यात आली असून, प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्या विक्रांत आणि ईशाच्या प्रेम कहाणीत अनेक चढउतार येत आहेत. विक्रांतचा शत्रू जालिंदर याच्या एण्ट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. हा जालिंदर विक्रांतविरोधात ईशाला भडकावण्याचाही प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेत पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची फार उत्सुकता लागून राहिली आहे. तर दुसरीकडे ही मालिका महाराष्ट्रासाठी घातक असल्यामुळे बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

WebTitle : marathi news social worker demands to band tula pahte re marathi serial 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT