बातम्या

नाशिकमध्ये कोट्यवधीचा आयटी रिटर्न गैरव्यवहार 

विनोद बेदरकर

नाशिक - नोटाबंदीनंतर दीड वर्षे सुट्या न घेता जादा काम करून नोटा छापणाऱ्या चलार्थपत्र मुद्रणालयातील प्रेस कामगारांना प्राप्तिकर वाचविण्यासाठी सुधारित आयटी रिटर्न भरण्याचा सल्ला चांगलाच महागात पडला आहे. प्राप्तिकर विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याने परतावा (रिफंड) मिळविण्याच्या अमिषाला बळी पडलेल्या अनेक कामगारांवर नोटा छपाई कालावधीत जेवढे कमावले, त्याहून आधिक पट गमविण्याची वेळ आली आहे. 

रिटर्न भरून परतावा मिळविण्यासाठीच्या साधारण बारा ते साडेबारा कोटींच्या सातशेहून अधिक प्रकरणाची प्राप्तिकर विभागाने विशेष आधिकारी नेमून चौकशी सुरू केली आहे. ही प्रक्रिया सुरू असल्याने तूर्तास विभागाचे अधिकारी याविषयी मौन बाळगून आहेत. रिटर्न भरून परतावा मिळविणाऱ्यांत सर्वाधिक नाशिक रोडचे प्रेस कामगार आहेत. दीड वर्षे जादा काम करून नोटा छापणाऱ्या कामगारांना त्याबदल्यात घसघशीत मोबदला मिळाला. मात्र, जेवढे जास्त उत्पन्न तेवढा जादा प्राप्तिकर कापला गेला. मग रिटर्न भरून परतावा मिळविण्याच्या प्रयत्नातून गैरव्यवहार जन्माला आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या चौकशीचा कामगारांनी चांगलाच धसका घेतला आहे. 

काय आहे प्रकरण 
जादा कामामुळे प्रेस कामगारांचे वार्षिक उत्पन्न वाढल्याने प्राप्तिकर विभागाने तितकाच घसघशीत प्राप्तिकर कापून घेतला. सरासरी अडीच ते तीन लाखांच्या आसपास कर  कापून गेल्यानंतर तो वाचविण्यासाठी काही लेखा परीक्षकांनी दिलेले भन्नाट फंडे चौकशीत पुढे आले असून, त्यातून प्रेस कामगारांमागे चौकशीचे लचांड लागले आहे. काहींनी 20 ते 25 हजार रुपये फीच्या मोबदल्यात लाख ते दीड लाखापर्यंत रिफंडही मिळवले. त्यावरून सुधारित आयटी रिटर्न भरण्याची शक्कल काहींनी लढवली. एकाचवेळी शेकडो लोकांना रिफंड मिळू लागल्याने प्राप्तिकर विभागाला शंका आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 

कामगारांना नोटिसा पाठविल्या आहेत. चौकशी झाल्यानंतर आमचे प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील. चौकशी सुरू असल्याने त्याविषयी 
काहीच सांगता येणार नाही. 
- धनराज बोराडे, चौकशी अधिकारी 

Web Title: marathi news sakal exclusive Crores of IT returns fraud in Nashik

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT