बातम्या

नाशिकमध्ये रक्षकच बनला भक्षक!

सकाळ न्यूज नेटवर्क

नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिस शिपायाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व 11 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना दिंडोरी येथे 2017 मध्ये घडली होती. गोरक्षनाथ ऊर्फ गोरख मधुकर शेखरे (वय 25, रा. टेलिफोन कॉलनी, दिंडोरी) असे आरोपीचे नाव आहे. 

असा घडला प्रकार...

गोरख शेखरे मुंबईतील भायखळा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून नियुक्तीला होता. 2017 मध्ये तो सुटीवर दिंडोरीला आला होता. अल्पवयीन पीडित घरासमोरील ओट्यावर भांडे घासत होती. त्या वेळी आरोपी शेखरे याने तिला बाजूला येण्याचा इशारा केला. त्याकडे पीडितेने दुर्लक्ष केले. नंतर आरोपी शेखरे याने तिचे तोंड दाबून बळजबरीने घराजवळच्या बाथरूममध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत पॉक्‍सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. 

दहा वर्षे सक्तमजुरी आणि 11 हजारांचा दंड
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधा नायर यांच्यासमोर झाली. शेखरेविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने न्यायाधीश श्रीमती सुधा नायर यांनी त्यास दहा वर्षे सक्तमजुरी आणि 11 हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला एका वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. सरकारी पक्षातर्फे श्रीमती ऍड. रेवती कोतवाल यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक निरीक्षक सय्यद, सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद आढाव, महिला पोलिस शिपाई ज्योती उगले यांनी पाठपुरावा केला.  

Web Title  Rapist Police Got Punishment For Ten Years Servitude 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT