बातम्या

राहुल गांधी यांनी सार्वजनिक केला राजीनामा. मोतीलाल व्होरा अंतरिम अध्यक्ष? 

सकाळ न्यूज नेटवर्क

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर ठाम आहेत. पक्षानं आता लवकरात लवकर अध्यक्षपदाची निवड करावी अशी मागणी राहुल गांधी यांनी एका पत्राद्वारे केलीय. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारलीय. पक्ष योग्य तो निर्णय घेईल असंही राहुल गांधींनी म्हंटलंय. याबाबतचं एक चार पानांचं पत्रंही राहुल गांधींनी पक्षाला पाठवलंय. मोतीलाल व्होरा काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मात्र, काँग्रेस वर्किंग कमिटीने त्यांचा राजीनामा नामंजूर केला होता. परंतु, राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम होते. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार नाही ही ठाम भूमिका घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. हजारो कार्यकर्त्यांसह अनेकांनी त्यांच्या समर्थनार्थ राजीनामेही देऊ केले आहेत. 

 

 

दरम्यान, तुम्हीच पक्षाध्यक्षपदी राहा, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ, असे सांगत, पाच काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही गांधी यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. परंतु राहुल गांधी यांनी आपला निश्चय सोडणार नसल्याचे संकेत त्याचवेळी मिळाले होते. अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेऊनही राहुल गांधी राजीनाम्यावर कायम होते.

राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अत्यंत अस्वस्थ झाले होते. त्यांनंतर तेव्हापासून ते राजीनाम्यावर कायम होते. आज (ता.03) अखेर त्यांनी आपण आता काँग्रेस अध्यक्ष नसल्याचे घोषित केले.

WebTitle : marathi news rahul gandhi tweets his resignation letter accepts responsibility of loksabha 2019 defeat

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

DCW Employees Fired: दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचारी बडतर्फ.. उपराज्यपालांची मोठी कारवाई; कारण काय?

Ajit Pawar: तुमच्या घरी ४० वर्षे राहिली, तरी तिला बाहेरची समजाल का? सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत अजित पवारांचा सवाल

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

SCROLL FOR NEXT