बातम्या

त्या वादग्रस्त पुस्तकाबाबत भाजपची माघार, लेखकानंही मागितली माफी

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्ताचाच्या वादावर भाजपकडून अखेर पडदा टाकण्यात आलाय. या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी अखेर माफी मागितली आहे. दरम्यान हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे अशी माहिती भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. दरम्यान या प्रकाशित पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही असं देखील जावडेकर यांनी म्हटलंय. 
 

नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा @BJP4India शी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे.#ShivajiMaharaj @BJP4Maharashtra

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) January 13, 2020

छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही, असंही प्रकाश जावडेकर म्हणालेत. 

काँग्रेसचं आंदोलन मागे : 

भाजपकडून प्रकाश जावडेकर यांनी हे पुस्तक मागे घेण्याचं सांगितल्यानंतर काँग्रेसने देखील या पुस्तकाविरोधातील आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. आज राज्यभरात काँग्रेसतर्फे या पुस्तकाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार होतं.  याबद्दलची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील जनतेने या पुस्तकाविरोधात मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला आणि म्हणून प्रकाश जावडेकर यांनी हे पुस्तक मागे घेण्याची घोषणा केली असं बाळासाहेब थोरात म्हणालेत. पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने माफी मागावी असं देखील बाळासाहेब थोरात म्हणालेत. काँग्रेसकडून या पुस्तकाविरोधात आज आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आलंय 

Web Title: prakash javadekar informs about taking aaj ke shivaji narendra modi book back congress rolls back agitation

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT