बातम्या

कच्छमध्ये पाकिस्तानी कमांडोजची घुसखोरी; सुरक्षायंत्रणांना सतर्कतेचे आदेश

संजय डाफसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध कमालीचे ताणले गेलेत. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान पुरता हाताघाईवर आलाय. अशातच गुजरातच्या कच्छ भागातून पाकिस्तानच्या कामांडोजनं भारतात घुसखोरी केल्याची बातमी पुढे येतीय. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. गुजरात किनारपट्टीला छावणीचं स्वरूप आलं असून समुद्रातल्या प्रत्येक हालचालीवर नौदल बारीक लक्ष ठेवून आहे. 

याशिवाय श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहितीही काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचे हे दहशतवादी असून त्यांच्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. 

कोस्ट गार्ड, पोर्ट प्राधिकरण, कस्टम, कोस्टल पोलिस, नौदल सर्व यंत्रणांना अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकचे नेते सातत्यानं भारताविरोधात गरळ ओकतायेत. दहशतवाद्यांच्या आडून भारतात हल्ले करण्याची योजनाही पाकमध्ये आखली जातीय. मात्र भारतीय लष्कर पाकचे नापाक मनुसबे कधीच यशस्वी होऊ देणार नाही हेही पाकिस्ताननं लक्षात घ्यायला हवं. 


WebTitle : marathi news pakistani commandos entered India from kutch borders security forces on high alert 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

Mobile Battery Saving Tips: ...म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला

Buldhana : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! कॉलेजला जातानाच १९ वर्षाच्या ॠतूजाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Breakup Tips: पार्टनरला न दुखावता कसं कराल ब्रेकअप? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT