बातम्या

लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे - संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

केंद्रात शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देताना, तेही अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते दिले गेले, त्यामुळे शिवसेनेला भाजपकडून आणखी अपेक्षा आहेत. लोकसभा अध्यक्षांची निवडणूक १९ जून रोजी होणार आहे. याबाबत मेनका गांधींसह भाजपच्या काही नेत्यांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे शिवसेनेने लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे. मात्र, भाजप हे पद शिवसेनेला देईल का, याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कारण ‘एनडीए’त नसलेल्या बीजेडी किंवा वायएसआर आदी पक्षांना उपाध्यक्षपद देऊन राज्यसभेतील बहुमताची बेगमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याची कुणकुण शिवसेनेला लागताच त्यांनी लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार असल्याचे वक्तव्य केले आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेनेचे सर्वाधिक खासदार निवडून आले आहेत. प्रादेशिक पक्ष बीजेडीचे १३, तर जगनमोहन रेड्डींच्या पक्षाचे २२ खासदार निवडून आले आहेत. या दोन पक्षांना चुचकारत जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Web Title: We want Vice President post in the Lok Sabha Shiv Sena

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

SCROLL FOR NEXT